Union Budget 2023 Live Updates : निर्मला सीतारामन यांच्या सात घोषणा

मुंबई तक

union budget 2023 live updates fm nirmala sitharaman budget speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला असताना आणि मंदीचं सावट असताना हा अर्थसंकल्प मांडला जात असल्यानं सगळ्याचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे महागाईच्या झळा जाणवत असताना सर्वसामान्यांनासह मध्यमवर्गीयांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

union budget 2023 live updates fm nirmala sitharaman budget speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला असताना आणि मंदीचं सावट असताना हा अर्थसंकल्प मांडला जात असल्यानं सगळ्याचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे महागाईच्या झळा जाणवत असताना सर्वसामान्यांनासह मध्यमवर्गीयांना सरकारकडून दिलासा मिळणार की आणखी प्राप्तिकराचं ओझं वाढणार, याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा

2024 तयारी सुरू! मोदी सरकारने बजेटमध्ये केली सर्वात मोठी घोषणा

प्राप्तिकरांच्या मर्यादेत वाढ करून सरकार दिलासा देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. महागाईत होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय करदात्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.

काय स्वस्त, काय महाग होणार?

-खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होईल.

-इलेक्ट्रॉनिक वाहनं स्वस्त होणार.

-परदेशातून येणारी चांदी होणार महाग

हे वाचलं का?

    follow whatsapp