अमेरिकेतील SV बँकेचं दिवाळं; पण भारतातील ‘श्यामराव विठ्ठल’ बँक का चर्चेत आली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Silicon Valley Bank News :

अमेरिकेतील एक प्रमुख बँक असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ बँक (Silicon Valley Bank) बंद होणार असल्याच्या घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्नियातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ही बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर सर्व मालमत्ता एकाच दिवसात जप्त करण्यात आली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे. ही बँक विशेषतः टेक स्टार्टअप्सना कर्ज देण्यासाठी ओळखलं जायचं. (US regulators announced the closure of Silicon Valley Bank on Friday)

दरम्यान, ही बँक बुडाल्यानंतर अमेरिकेसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील १६वी सर्वात मोठी बँक होती. २००८ साली अमेरिकेत वॉशिंग्टन म्युचअल आणि लेहमन ब्रदर्स बुडाल्यानंतर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. ही बँक कोसळल्यानंतर जगभरात आर्थिक मंदीची लाट आली होती. अमेरिकेत याची सर्वाधिक झळ बसली होती. या दिवाळखोरीनंतर आता अमेरिका पुन्हा एकदा बँकिंग संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारतातील श्यामराव विठ्ठल बँक का आली चर्चेत?

दरम्यान, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ही बँक बुडाल्यानंतर भारतातील श्यामराव विठ्ठल ही बँक मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. याच कारणही तसंच आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेचं SVB हे संक्षिप्त रुप म्हणून ओळखलं जातं. तर भारतात श्यामराव विठ्ठल बँकेचंही SVC बँक हे संक्षिप्त रुप म्हणून ओळखलं जातं.

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

ADVERTISEMENT

याच कारणामुळे SVB ही बँक बुडाली अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र श्यामराव विठ्ठल बँक अर्थात SVC बँकेकडून याबाबतच खंडन करण्यात आलं आहे. ही केवळ एक अफवा असल्याचं सांगण्यात आलं असून SVB बँकेचा आणि SVC बँकेचा कोणताही संबंध नसल्याचही स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

‘मविआ’चा प्लॅन ठरला; भाजप-शिवसेना युतीला ३ महिन्यांत फोडणार घाम?

काय म्हटलं SVC अर्थात श्यामराव विठ्ठल बँकेनं?

SVC बँक ही भारतातील ११६ वर्ष जूनी एक अग्रगण्य बँक आहे. तसंच ही केवळ भारतातच सक्रिय आहे. या बँकेचा एकूण व्यवसाय हा ३१ हजार ५०० कोटी रुपयांचा असून १४६ कोटी रुपयांचा निव्वल नफा आहे. SVB बँकेचा आणि SVC बँकेचा कोणताही संबंध नाही. ही केवळ एक अफवा आहे. या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात बँकेकडून कायदेशीर मदत घेतली जाणार आहे, असं SVC अर्थात श्यामराव विठ्ठल बँकेकडून स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT