महागाईचा फटका! आता मुंबईकरांचा वडापावही झाला महाग
वडा-पाववर अर्धी मुंबई जगते असं म्हणतात. कारण वडा-पावकडे अनेक मुंबईकर जेवणाचा पर्याय म्हणून पाहतात. मात्र हाच वडा-पाव आता महाग झाला आहे. वाढत्या महागाईचा फटका वडा-पावलाही बसला आहे. (VadaPav Price Hike ) देशात खाद्य तेलांच्या किंमती, व्यावसायिक सिलिंडरचे दर हे सगळं वाढलं आहे. त्यामुळे आता वडा-पावच्या किंमती दोन ते पाच रूपयांनी वाढ जाली आहे. एवढंच नाही […]
ADVERTISEMENT
वडा-पाववर अर्धी मुंबई जगते असं म्हणतात. कारण वडा-पावकडे अनेक मुंबईकर जेवणाचा पर्याय म्हणून पाहतात. मात्र हाच वडा-पाव आता महाग झाला आहे. वाढत्या महागाईचा फटका वडा-पावलाही बसला आहे. (VadaPav Price Hike )
ADVERTISEMENT
देशात खाद्य तेलांच्या किंमती, व्यावसायिक सिलिंडरचे दर हे सगळं वाढलं आहे. त्यामुळे आता वडा-पावच्या किंमती दोन ते पाच रूपयांनी वाढ जाली आहे. एवढंच नाही तर मिरची, तेल, पाव या सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत त्यामुळे किंमतीत वाढ करण्यावाचून पर्याय उरला नाही असं अनेक वडा-पाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलं का?
मुंबईतल्या वडा-पावचा इतिहास सुमारे ५० वर्षांहून अधिक जुना आहे. मुंबईतल्या अशोक वैद्य यांनी सर्वात आधी वाड-पाव तयार केला होता. १९६६ मध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढत होता. अशोक वैद्य हे शिवसेनेचे कार्यकर्ता झाले. कार्यक्रत्यांनी निष्क्रिय बसू नये असं बाळासाहेब ठाकरे कायमच सांगत असता. छोटे-छोटे व्यवसाय करत राहा असंही ते सांगत. त्यातूनच दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर अशोक वैद्य यांनी वडा-पावचा स्टॉल सुरू केला जो लोकप्रिय झाला. त्यानंतर मुंबईत ठिक-ठिकाणी वडा-पावचे स्टॉल्स, गाड्या, ठेले, दुकानं दिसू लागली.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला वडापाव १२ ते १५ रूपयांच्या घरात मिळतो. काही ठिकाणी जंबो वडापावची किंमत २० रूपयेही आहे. सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्यात दरांमध्ये वडा-पाव मिळतो. मात्र आता आता या किंमतीत २ रूपये ते ५ रूपयांची वाढ होणार आहे. डाळीचं पीठ, तेल, गॅस सिलिंडर या सगळ्यांचेच दर वाढल्याने आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचं वडा-पाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
वडा-पावचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे सुकी लाल चटणी, हिरवी चटणी, पाव आणि गरम गरम वडा. त्यासोबत तळलेली मिरची. हे पाहून कुणाच्या तोंडाला पाणी सुटेल. या वडापावला ग्लॅमरस करण्याचाही बराच प्रयत्न झाला. त्यातून भट्टी वडा-पाव, शेजवान वडा-पाव, मस्का ब्रेड वडा, ग्रील वडा पाव असे अनेक प्रकारही आले. मात्र अस्सल वडा-पाववरचं मुंबईकरांचं आणि ज्या ज्या ठिकाणी वडा-पाव गेला त्यांचं प्रेम कमी झालं नाही.
वडा पाव परवडणाऱ्या दरांमध्ये मिळतो आहे. मात्र आता त्याच्या किंमतीतही वाढ होणार आहे हे निश्चित झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT