राज ठाकरेंनी सोपवली नवी जबाबदारी! वसंत मोरे म्हणाले, ‘बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ’
राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले आणि त्याच काळात पुणे शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वसंत मोरेंवर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केलीये. शस्त्रक्रियेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पक्ष कार्यात सक्रिय झाले आहेत. मनसे […]
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले आणि त्याच काळात पुणे शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वसंत मोरेंवर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केलीये.
ADVERTISEMENT
शस्त्रक्रियेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पक्ष कार्यात सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत होत असून, राज ठाकरेंनी सोमवारी बैठकही घेतली. दरम्यान, राज ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत.
यात मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष वसंत मोरे यांचीही पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यासह वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीये.
हे वाचलं का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण – मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. #MNSAdhikrut pic.twitter.com/56bRWkAAUe
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 22, 2022
वसंत मोरेंनी फेसुबक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. “साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ… कारण मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय… आणि हो, बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो! त्यात भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली, दौंड, इंदापूर आणि पुणे शहर हेही आहे बरं का! म्हणून तर म्हणलो मी येतोय”, असं वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
शिंदेंचं सरकार येताच वसंत मोरेंचं आव्हान; म्हणाले, ‘कितीही ताकद लावा, पुण्याचा महापौर…’
ADVERTISEMENT
मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेपासून मोरेंनी राखलं होतं अंतर
राज ठाकरे यांनी एप्रिलमध्ये मशिदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर बराच राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेपासून वसंत मोरे मात्र अंतर राखून ठेवून होते. मनसेच्या आंदोलनावेळी वसंत मोरे बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला निघून गेले होते.
ADVERTISEMENT
वसंत मोरे मनसे सोडणार असल्याची रंगली होती चर्चा
वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते नाराज झाले होते. त्यानंतरच्या काळात वसंत मोरे मनसे सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचंही म्हटलं गेलं. तर दुसरीकडे भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच भाजपत येण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट मोरेंनी केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT