विधान परिषद निवडणुकीमुळे भाजप सावध! राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यानं मत फुटीची भीती राजकीय पक्षाना सतावू लागली आहे. त्यामुळे भाजपबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी आमदारांबद्दल खबरदारी घेण्यास सुरूवाती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांची हॉटेलवारी होणार आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेनं आमदारांना मुंबईत बोलावलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून ५ जण, तर महाविकास आघाडीकडून ६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सहावी जागा जिंकणार की, भाजप राज्यसभेप्रमाणेच आघाडीला मात ५वी जागा मिळवणार यांचीच चर्चा सध्या होतेय.

भाजप आणि काँग्रेसला जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरच्या मतं लागणार आहे. विधान परिषदेला गुप्त मतदान असल्यानं मत फुटीचीही भीती राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे मतफुटी टाळण्यासाठी आणि अधिकची मते मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होताना दिसत आहे.

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून नाराज अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू

आमदारांची ‘हॉटेल’वारी

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपनं खबरदारी घेतली आहे. भाजप आपल्या आमदारांना पुन्हा ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. मतदानाच्या दिवसांपर्यंत भाजपचे आमदार हॉटेलमध्ये राहणार असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन…

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एक जागा गमवावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सावध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेल्याची माहिती असून, त्यांना मुंबईत पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे शिवसेनेनंही आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेनं आपल्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगितलं असून, सर्व आमदारांना शनिवारपासून मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे.

आघाडी की, भाजप… विधान परिषद निवडणुकीत कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार?, आकडे काय सांगतात?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची बैठक मंगळवारी (१५ जून) विधान भवनात पार पडली. या बैठकीनंतर आज महाविकास आघाडीतील नेत्यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे.

‘बविआ’च्या तीन मतांसाठी रस्सीखेच

काँग्रेस आणि भाजपला अधिकची मतं लागणार असून, मतांच्या बेरजेत छोटे पक्ष आणि अपक्षांना स्वतःकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात बहुजन विकास आघाडीची तीन मतं मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे.

संपत्तीत काही कोटींची घट तरीही प्रसाद लाड सर्व उमेदवारांना ‘भारी!’

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच भाजपकडून हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला गेलाय. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT