एकनाथ शिंदेंचा निर्णय योग्य की अयोग्य हे जनताच ठरवेल-अजित पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांना साथ लाभली ती शिवसेनेतल्या ४० आमदारांची. तसंच १२ खासदारही शिंदे गटासोबत आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. २९ जूनला महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यानंतर ३० जूनला राज्यात […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांना साथ लाभली ती शिवसेनेतल्या ४० आमदारांची. तसंच १२ खासदारही शिंदे गटासोबत आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. २९ जूनला महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यानंतर ३० जूनला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. याबाबत आता अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
”हे वागणं बरं नव्हं, कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही” असं अजित पवार का म्हणाले?
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंबाबत?
“२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. या घटनेच्या जास्त खोलात मी जाणार नाही. लोकाशाहीत अशा घटना घडत असतात. मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे सामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांची २ लाखापर्यंत कर्जमापी केली. त्यांना ५० हजार रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला गेला होता. मात्र मार्च २०२०मध्ये कोरोना आल्यामुळे ते अनुदान राहिले. त्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला गोला होता. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.