अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक
त्रिपुरा राज्यात मशिदीत हिंदूंनी तोडफोड केली आहे आणि मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. याचाच निषेध नोंदवण्यासाठी अमरावती शहरात मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली. 15 ते 20 हजार लोकांनी मोर्चाही काढला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील आणि […]
ADVERTISEMENT
त्रिपुरा राज्यात मशिदीत हिंदूंनी तोडफोड केली आहे आणि मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. याचाच निषेध नोंदवण्यासाठी अमरावती शहरात मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली.
ADVERTISEMENT
15 ते 20 हजार लोकांनी मोर्चाही काढला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकरांनी भाजप विरोधात आणि आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हे वाचलं का?
दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले होते तर यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याने जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान या मुस्लिम समाजाच्या मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले असून शहरात तणाव निर्माण झाला आहे तर या विरोधात भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि भाजप नेते तुषार भारतीय सह भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. तातडीने अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.
ADVERTISEMENT
मालेगावातही घोषणाबाजी
ADVERTISEMENT
त्रिपुरा येथील विशिष्ट समुदायाविरोधात झालेल्या हिंसेच्या विरोधात महाराष्ट्रात आज बंद पुकारण्यात आला होता. मालेगाव हा मुस्लिमबहुल भाग आहे या ठिकाणी हा बंद दुपारपर्यंत शांततेत सुरू होता. मात्र अचानक जमावाने या ठिकाणी जमा होत घोषणाबाजी सुरू केली आणि जमाव आक्रमक होत गेला.
जमाव रस्त्यावर येतोय हे बघून पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने दगडफेक केली. यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT