वाशिम : ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची पिक विमा अधिकाऱ्याला मारहाण, लगावल्या कानाशिलात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, वाशिम

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर एक व्हायरल झाला असून, यात दोन व्यक्ती एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. या व्हिडीओतील घटना आता समोर आली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका पिक विमा अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे. वाशिम जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या कारणाने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.

पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतल आहे. स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख दामू इंगोले यांनी पिक विमा कंपनीच्या एका अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्या. पीक विम्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर स्वाभिमानीच्या दामू इंगोले यांनी कार्यालयातच कर्मचार्‍याला थापडा मारल्या.

हे वाचलं का?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या अधिकाऱ्याला मारहाण केली, तो रिलायन्स विमा कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार नुकसान झालेल्या पिकांच्या विम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात खेटे मारत असुन, तशा तक्रारी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्यानंतर विदर्भ अध्यक्ष दामू इंगोले यांच्याकडे केल्या.

ADVERTISEMENT

इंगोले यांनी रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेला बोलावून पीक विमासंदर्भात जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरं आली. त्यामुळे स्वाभिमानीच्या दामू इंगोले यांनी कंपनीच्या कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावल्या. तसेच अधिकाऱ्याला मारत कक्षातून बाहेर घेऊन आले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवल्या नाहीत, तर यापुढे पीक विमा कंपनीचं ऑफिस फोडण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारानंतर पीक विमा कंपनीला दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT