बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंसंदर्भात अनेक महत्वाच्या बाबी समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांच्या ताब्यात असलेली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. हीच स्कॉर्पिओ कार काही दिवसांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली. सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वाझे यांनी विक्रोळी पोलीसांना हिरेन यांच्या गाडीचा तपास करु नका असे आदेश दिल्याचा NIA ला संशय आहे. १८ फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

मुंब्रा खाडीत कसा फेकला मनसुखचा मृतदेह? ATS च्या अटकेत असलेल्या आरोपीने दिली माहिती

NIA च्या अधिकाराऱ्यांनी नरीमन पॉईंट भागात असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलला भेट देऊन तिकडचं सीसीटीव्ही फुटेज आणि DVR आपल्या ताब्यात घेतलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझे दोन बॅग घेऊन येत असताना दिसत असल्याची माहिती NIA च्या सूत्रांनी दिली. खोट्या कादगपत्रांच्या सहाय्याने सचिन वाझे या हॉटेलमध्ये राहिल्याचा NIA ला संशय आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सापडल्याच्या किमान एक आठवडाआधी सचिन वाझे यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनला फोन करुन सिनीअर पोलीस इन्स्पेक्टरला हिरेन यांच्या गाडीची चौकशी करु नका असं सांगितल्याचा NIA ला संशय आहे.

हे वाचलं का?

“या प्रकरणाचा तपास CIU कडे वर्ग करण्यात येईल याची माहिती सचिन वाझेंना मिळाली होती, वाझेंना या प्रकरणातले सर्व पुरावे नष्ट करायचे होते. वाझेंनी सर्व संबंधित पोलिस यंत्रणांना फोन करुन चौकशी थांबवण्याचे आदेश दिले. विक्रोळी पोलीस स्टेशनला फोन करुन त्यांनी या प्रकरणातला आपला सहभाग पुढे येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली. वाझेंच्या फोननंतर विक्रोळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला आणि काही वेळाने हा तपास CIU कडे आला.” ज्येष्ठ IPS अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली.

सचिन वाझे नरीमन पॉईंमध्ये राहत असताना कोणाला भेटले आणि यासाठी हॉटेलचं पेमेंट त्यांनी कशा स्वरुपात दिलं याचा तपास आता NIA चे अधिकारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझेंनी हॉटेलमध्ये बनावट आधारकार्डाची कॉपी दिली होती…पण या आधारकार्डावर फोटो हा सचिन वाझे यांचाच होता. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT