Vidhan Parishad Election : पाचही उमेदवार विजयी, राज्यात ही परिवर्तनाची नांदी-फडणवीस
विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी […]
ADVERTISEMENT
विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक हे दोघेही अडचणीत असून, आजारी असून या ठिकाणी आले त्यांचे मी विशेष मी आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीतल्या विजयामुळे परिवर्तानाची नांदी आता पाहण्यास मिळते आहे. सरकारच्या विरोधातला असंतोष समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’, रावसाहेब दानवेंनी केलं कौतुक
हे वाचलं का?
महाविकास आघाडीविरोधात आम्हाला चांगली मतं मिळाली. १३४ मतं आम्हाला मिळाली आहेत. आमचे पाचही उमेदवार सर्वाधिक मतं मिळवून निवडून आले आहेत. देशात मोदींची लाट आहे आणि महाराष्ट्रही मोदींच्या मागे उभा आहे हेच या निकालांनी दाखवून दिलं आहे.
सदाभाऊ खोतांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली?; फडणवीस म्हणतात…
ADVERTISEMENT
आमदारांचा असंतोष मतांमध्ये परिवर्तित झाला आहे. असंतोष असाच वाढत राहिला तर काय होऊ शकतं याबाबत मला काहीही बोलायचं नाही तुम्ही ते जाणता. कुणाची किती मतं फुटलेली दिसतात हे तुमचे सगळे कयास आहेत जी सत्यता आहे ती आम्हाला माहित आहे. सगळ्या पक्षातल्या आमदारांचे, अपक्षांचे आमदारांचे मी आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली किमया साधून महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. राज्यसभेत भाजपने यश मिळवलं होतंच त्यापाठोपाठ आता विधान परिषदेतही भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच हा विधान परिषदेचा हा सामना होता. तो सामना भाजपने मारला आहे. लोकाभिमुख सरकार देणं हा आमचा मानस आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपकडे पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी पुरेशी मतंही नव्हती तरीही आमच्यावर जो विश्वास आमदारांनी दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT