नक्षलवादी बनण्याआधी मिलिंद तेलतुंबडे नेमकं काय करायचा?
भास्कर मेहरे, यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात शनिवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक झाली. ज्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. याचवेळी नक्षलवाद्यांचा नेता समजला जाणारा मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला. याच मिलिंद तेलतुंबडेवर तब्बल 50 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्याच्या […]
ADVERTISEMENT
भास्कर मेहरे, यवतमाळ
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात शनिवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक झाली. ज्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. याचवेळी नक्षलवाद्यांचा नेता समजला जाणारा मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला. याच मिलिंद तेलतुंबडेवर तब्बल 50 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्याच्या नातेवाईकांनी तो नक्षलवादी बनण्याआधी नेमकं काय करायचा याची माहिती दिली आहे.
1996 साली गाव सोडून गेलेला मिलिंद तेलतुंबडे हा पुन्हा गावात परतलाच नाही. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले होते. त्यानंतर तो शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहे. मिलिंद तेलतुंबडे हा सहावा नंबरचा घरात होता.
हे वाचलं का?
मिलिंद तेलतुंबडे संदर्भात बोलण्यास गावकऱ्यांनी नकार दिल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, काल गडचिरोली मधील धानोरा तालुक्यातील जंगलात पोलिसांच्या सात पथक शोध अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी अचानक सी60 पथकावर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं त्यात नक्षली संघटनेचा मोठा नेता म्हणून ओळख असलेला मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला.
मिलिंद हा उच्चशिक्षित आहे. त्याने कराटेचं संपूर्ण प्रशिक्षण देखील घेतलं होतं. लहान पणापासून तो अतिशय हुशार होता. त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर WCL मध्ये एक वर्ष नोकरीही केली होती.
ADVERTISEMENT
त्यानातर त्याने आयटेक युनियनचे काम सुरू केले होते. जिथे तो सेक्रेटरी होता. याचवेळी वणी भागात त्याने कामगार संघटना वाढवल्या. पण यानंतप तो अचानक नक्षली चळवळीत सक्रिय झाला.
ADVERTISEMENT
पाहा मिलिंद तेलतुंबडे यांच्या नातेवाईकाने काय दिली नेमकी माहिती.
‘मिलिंद तेलतुंबडे हा भूमीहीन शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला होता. त्यानंतर शिक्षण घेऊन तो WCL इथे इलेक्ट्रिशन म्हणून नोकरीला लागला होता. WCL मध्ये लागल्यानंतर कामगार नेता म्हणून आयटेक युनियनमध्ये जॉईन झाला.’
‘आयटेक युनियनचं जे संपूर्ण जाळं दिसतं आहे हे त्याने निर्माण केलेलं. त्यानंतर 1996 मध्ये त्याने संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली आणि तेव्हा त्याने सांगितलं की, जनतेच्या सेवेसाठी मी संपूर्ण त्याग करत आहे. मी आता चाललोय. तेव्हापासून त्याचा परिवारसोबत कोणताही संबंध नव्हता. काल जी बातमी मिळाली त्यामध्ये ते गेले असं माहित पाडलं.’ अशी माहिती मिलिंद तेलतुंबडेचा पुतण्या विप्लव तेलतुंबडे याने दिली आहे.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मूळचा वणी येथील असून तो गेल्या काही वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. नक्षल्यांना सोपा रस्ता कोणता आहे आणि नक्षली नेत्यांसाठी सुरक्षित ठिकाण कोणतं असू शकतं हे शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद तेलतुंबडेने विस्तार दलम नावाच्या कमांडो युनिटमध्ये 200 लोकांची भरती केली होती.
Gadchiroli Encounter : 26 नक्षलवाद्यांची नावं आली समोर; अनेकांवर लाखो रुपयांचा इनाम
नक्षलवाद्यांचा खात्मा करणारी सी-60 कमांडो टीम नेमकी कशी तयार झाली?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT