समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?
महाराष्ट्रात डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे आतापर्यंत 21 रूग्ण मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. भारतात या डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत. डेल्टा प्लसच्या आधी भारतात डेल्टा वेरिएंट आलेला, ज्यामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. आता डेल्टा वेरिएंटचाच पुढचा वेरिएंट डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळू लागल्याने कोरोनाची तिसरी लाट लवकर येतेय […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे आतापर्यंत 21 रूग्ण मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. भारतात या डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत. डेल्टा प्लसच्या आधी भारतात डेल्टा वेरिएंट आलेला, ज्यामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. आता डेल्टा वेरिएंटचाच पुढचा वेरिएंट डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळू लागल्याने कोरोनाची तिसरी लाट लवकर येतेय की काय अशीही चर्चा सुरू आहे? त्यामुळे हा डेल्टा प्लस वेरिएंट नेमका काय आहे तरी काय? डेल्टा पेक्षा डेल्टा प्लस किती वेगळा आहे? लस त्याच्यावर किती प्रभावी? त्याचा संसर्ग किती वेगाने होतोय? हेच आज समजून घेऊयात.
डेल्टा वेरिएंट जास्त घातक आहे, महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्याच्यावर लस कमी प्रभावी आहे, रोगप्रतिकारशक्तीला तर हा वेरिएंट चकवाच देतो, असे अनेक महत्वाच्या गोष्टी या डेल्टा प्लस वेरिएंटसंदर्भातल्या तुम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे.
सुरूवात करूयात डेल्टा वेरिएंट काय आहे?
B.1.617.2 याला डेल्टा वेरिएंट म्हणतात…तो भारतातच 2020 च्या ऑक्टोबरमध्ये सापडला. महाराष्ट्रातल्याच अमरावतीमधून तो सापडल्याचंही महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने म्हटलंय. पण who ने त्याचं नाव Delta असं ठेवलं.