Nitin Gadkari यांनी घोषित केलेला भारतातला पहिला ई-हायवे कसा आहे?
जशा एक्स्प्रेस इलेक्ट्रीसिटी वर धावतात, तशाचप्रकारे काही एक दिवसांत तुम्हाला रस्त्यावरच्या गाड्याही धावताना दिसतील. ज्याप्रमाणे एक्स्प्रेस किंवा मुंबई लोकलसाठीही वरती इलेक्ट्रीक वायर असतात आणि एक्स्प्रेसचं इंजिनाला जोडलेल्या असतात, ज्यामुळे पूर्ण ट्रेन इलेक्ट्रीसिटीच्या जोरावर धावते, तशाच प्रकारची सिस्टिम आता देशातल्या महामार्गांवरही करण्यात येणार आहे. या कामाला सुरूवातही झाली आहे, कसा असणार आहे देशातला पहिला इलेक्ट्रीक हायवे? […]
ADVERTISEMENT
जशा एक्स्प्रेस इलेक्ट्रीसिटी वर धावतात, तशाचप्रकारे काही एक दिवसांत तुम्हाला रस्त्यावरच्या गाड्याही धावताना दिसतील. ज्याप्रमाणे एक्स्प्रेस किंवा मुंबई लोकलसाठीही वरती इलेक्ट्रीक वायर असतात आणि एक्स्प्रेसचं इंजिनाला जोडलेल्या असतात, ज्यामुळे पूर्ण ट्रेन इलेक्ट्रीसिटीच्या जोरावर धावते, तशाच प्रकारची सिस्टिम आता देशातल्या महामार्गांवरही करण्यात येणार आहे. या कामाला सुरूवातही झाली आहे, कसा असणार आहे देशातला पहिला इलेक्ट्रीक हायवे? समजून घेऊयात.
सगळ्यात पहिले इलेक्ट्रीक हायवे असतो काय ते पाहा
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा हायवे ज्यावर इलेक्ट्रीक वाहनच जाऊ शकतील असा हायवे. जसं आपण मगाशी इलेक्ट्रीक वायरवर ट्रेन कशा चालतात ते सांगितलं तशाच प्रकारे या हायवेवरची इलेक्ट्रॉनिक वाहनं या वायरमधून मिळणाऱ्या इलेक्ट्रीसिटीवर चालतील. अशाप्रकारे पहिल्यांदाच कोणत्या तरी हायवेवर इलेक्ट्रीक वाहनं वायरमधून मिळणाऱ्या इलेक्ट्रीसिटीवर धावणार असल्याने या हायवेला ई-हायवे म्हणलं जाणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या हायवेवर थोड्या-थोड्या अंतरावर चार्जिंग पॉईंट्ससुद्धा लावण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
कुठे असणार आहे हा इलेक्ट्रीक हायवे?
ADVERTISEMENT
– केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिल्याप्रमाणे दिल्ली-जयपूरदरम्यान हा महामार्ग असणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या मुंबई-दिल्ली महामार्गावरच 200 किलोमीटरची एक नवी लेन तयार करण्यात येते. या लेनवर केवळ इलेक्ट्रॉनिक वाहनंच धावतील. या महामार्गाच्या कामासाठी स्वीडनच्या कंपनीसोबत बोलणं सुरू असल्याचंही गडकरी म्हणालेत.
ई-हायवेचा फायदा काय होणार?
ई-हायवेमुळे लॉजिस्टिकचा जितका खर्च होतो तो 70 टक्क्यांनी घटणार आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही इतक्या वाढल्यात की त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्टसुद्धा वाढतोय…अशात जर इलेक्ट्रॉनिक वाहनं आली, ई-हायवे असतील तर हेच ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचतील.
याशिवाय पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना इलेक्ट्रॉनिक वाहनं एक नवा पर्याय ठरेल, जो पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त असेल असं म्ह्टलं जातंय.
जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी 3 प्रकारच्या टेक्नोलॉजी आहेत. पण भारत सरकारचं स्वीडनच्या कंपन्यांसोबत बोलणं सुरू आहे, त्यामुळे स्वीडनमध्ये जी पेंटाग्राफ सिस्टिम आहे तीच भारतात हायवेवर वापरली जाईल. हीच सिस्टिम भारतात ट्रेनसाठीही वापरली जाते. हायवेवर असलेल्या वायर्समुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या थेट इंजिनला इलेक्ट्रिसिटी मिळेल, किंवा बॅटरी असेल तर ती चार्ज होईल.
पेंटाग्राफ सोडूनही कंडक्शन आणि इंडक्शन आणि कंडक्शन मॉडेलही असतात. कंडक्शन मॉडेलमध्ये रस्त्याच्या वरती नाही मध्ये वायर असतात ज्यातून इलेक्ट्रिसिटी मिळते आणि इंडक्शनमध्ये वायर नसतातच, त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंटने वाहनांना इलेक्ट्रिसिटी पुरवली जाते.
Nitin Gadkari युट्यूबवरून 4 लाख कसे कमवतात? समजून घ्या
आता साहजिकच प्रश्न पडेल की वायर तर एका विशिष्ट उंचीवर असतील…पण वाहनं तर वेगवेगळ्या उंचीची असतात मग अशा परिस्थिती हायवेवर सगळ्या वाहनांना कशी इलेक्ट्रिसिटी मिळेल?
– तर ज्या स्वीडनमधून आपण हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा विचार करतोय, तिथे केवळ अवजड वाहनं किंवा मालवाहू वाहनांनाच हायवेवर इलेक्ट्रिसिटी पुरवली जाते. भारतातही तसंच होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ट्रक-टेम्पोसारख्या वाहनांना थेट वायरमधून इलेक्ट्रिसिटी मिळेल, आणि छोटी वाहनं असतील त्यांच्यासाठी हायवेवर काही ठराविक अंतरावर चार्जिंग पॉईंट्स ठेवले जातील.
जगाचा विचार करायचा झाला तर स्वीडन हा जगातला पहिला असा देश आहे जिथे ई-हायवे सुरू करण्यात आलेत. 2016 मध्ये ट्रायल्स घेतल्यानंतर 2018 मध्ये ई-हायवे सुरू झाला, तर जर्मनीमध्ये 2019 मध्ये ई-हायवे सुरू झाला. ब्रिटन आणि अमेरिकेतही ई-हायवेवर काम सुरू आहे.
ADVERTISEMENT