भाजप-काँग्रेसमधलं Toolkit प्रकरण आहे काय? Toolkit म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संपूर्ण देश लढतो आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट नक्कीच भयंकर आहे. आजवर झालेल्या मृत्यूंमुळे आणि वेगाने पसरलेल्या कोरोनामुळे त्याचं गांभीर्य किती आहे हे आपण जाणतो आहोतच. अशातच Toolkit प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 18 मे रोजी संबित पात्रा यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये काँग्रेसवर आरोप केले होते. कोरोना संकटादरम्यान एका टूलकिटव्दावरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचं काम केलं गेलं आहे. काँग्रेसने प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काही पत्रकार मित्रांना हाताशी धरून आणि टूलकिटच्या मदतीने वातावरण तापवल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला. #CongressToolkitExposed हा हॅशटॅगही ट्रेंड झाला.

ADVERTISEMENT

दिशा, निकिता आणि शांतनू यांनी तयार केलं टूलकिट-दिल्ली पोलीस

काँग्रेसचं कौतुक आणि मोदींची बदनामी अशी रणनीती असलेलं हे टूलकिट एक्स्पोज झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. भारतात सापडणाऱ्या कोरोना स्ट्रेनला मोदी स्ट्रेन संबोधलं जावं असं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचाही दावा भाजप नेते संबित पात्रा यांनी केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हे टूलकिट हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं.

हे वाचलं का?

काँग्रेसने फेटाळले सगळे आरोप

काँग्रेसने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी भाजप काँग्रेसच्या नावाने खोटं टूलकिट पसरवत असल्याचा आऱोप केला. भाजपने हा देखील आरोप केला की सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून मोदींवर टीका करण्याच्या सूचना हा देखील टूलकिटचाच एक भाग होता. राजीव गौडा यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की सेंट्रल व्हिस्टाबाबतची रिसर्च नोट ही त्यांच्या विभागाने तयार केली.

ADVERTISEMENT

काँग्रेसने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देत FIR नोंदवण्याची मागणी केलीय. तसंच ट्विटरने पात्रांच्या सुरुवातीच्या ट्वीटवर मॅन्युप्युलेटेड मीडिया हे लेबल लावणं यातून भाजपचा खोटेपणा उघडा पडलाय असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेस इतक्यावरच थांबलेलं नाही, त्यांनी टूलकिटबद्दलचे ट्वीट करणाऱ्या भाजप नेत्यांची अकाउंट्स कायमची निलंबित करावी अशीही मागणी ट्विटरकडे केलीय.

ADVERTISEMENT

Toolkit वापराने जगभरात आतापर्यंत सत्ताधाऱ्यांना असे बसले हादरे

आता आपण जाणून घेऊ की टूलकिट नेमकं असतं काय?

मुळात एखादं आंदोलन हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन चालविण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. जेव्हा इंटरनेट आणि मोबाइलचा जमाना नव्हता तेव्हा आंदोलनात भाग घेणारे एखाद्या डायरीमध्ये प्लॅनिंग लिहून ठेवायचे. कुठे भेटायचं, काय घोषणा असणार, कोणत्या गोष्टींवर जोर असेल इत्यादी. जेव्हा तंत्रज्ञान बदललं तेव्हा गुगल डॉकवर प्लॅनिंग सुरु झालं. यामुळे एक गोष्ट सहजपणे शक्य झाली की, आपण आपल्या कोणत्याही मित्राला किंवा सहकार्याला या डॉकमध्ये अॅड करणं किंवा काढून टाकणं शक्य झालं. ते देखील रिअल टाइम. असंच काहीसं काम दिशा रवीने टूलकिटमध्ये केल्याचा तिच्यावर आरोप आहे. हेच टूलकिट ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलं होतं. जाणून घ्या या टूलकिटमध्ये नेमकं काय लिहलं होतं?

टूलकिटमध्ये सर्वात वर लिहलं होतं की,

हे डॉक्यूमेंट त्या लोकांसाठी आहे ज्यांना भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाविषयी फार काही माहीत नाही. याच्या माध्यमातून ते परिस्थिती चांगल्या पद्धतीने समजू शकतील. आपल्या हिशोबाने निर्णय घेऊ शकतात की, त्यांना शेतकऱ्यांना समर्थन कसं द्यायचं आहे.या स्टेपनंतर अॅक्शनबाबत लिहलं गेलं. विशेषत: दोन पद्धतीच्या अॅक्शनबाबत. एक अर्जंट अॅक्शन आणि दुसरी प्रायर अॅक्शन (आधीची कृती) याबाबत लिहलं गेलं होतं. म्हणजे एक अशी कृती जी तात्काळ केली गेली पाहिजे आणि एक अशी कृती जी प्राधान्याच्या आधारे घेतली पाहिजे. अर्जंट अॅक्शनद्वारे शेतकरी आंदोलनाचं समर्थन करताना #FarmersProtest #StandWithFarmers या हॅशटॅगसह ट्विट करण्यास सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT