मी PM नरेंद्र मोदींना भेटलो, नवाज शरीफांना नाही-उद्धव ठाकरे
आज दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हे तिघेही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दहा मिनिटांसाठी वैयक्तिक भेटही झाली. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की होय आमची वैयक्तिकही भेट झाली. कारण मी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलो. नवाज शरीफ यांना […]
ADVERTISEMENT
आज दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हे तिघेही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दहा मिनिटांसाठी वैयक्तिक भेटही झाली. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की होय आमची वैयक्तिकही भेट झाली. कारण मी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलो. नवाज शरीफ यांना नाही. मी जर आपल्या पंतप्रधानांना भेटलो तर त्यात गैर काय? आमचे अजूनही चांगले संबंध आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुमची वैयक्तिक भेट झाली का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले?
हे वाचलं का?
मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.
50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यात यावी
ADVERTISEMENT
इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो
ADVERTISEMENT
मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण हा विषयही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला आहे
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही आम्ही पंतप्रधानांकडे मांडला
GST चं येणं लवकर मिळावं यासाठीही विनंती केली आहे
शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत अटी-शर्थी संबंधी आम्ही बीड मॉडेल तयार केलं आहे त्याबद्दलही चर्चा केली
बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं आदळत आहेत, तौक्ते वादळानेही दणका दिला. या वेळी जे मदत केली जाते ते निकष जुने झाले आहेत. आता ते निकष बदलण्याची गरज आहे याबाबतही आम्ही चर्चा केली
चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी मिळण्याबाबत चर्चा केली
मराठी भाषा दिन असतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलली जावीत अशीही विनंती केली.
CM Uddhav Thackeray पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीत, चंद्रकांत पाटील-फडणवीस ‘शकुनी’ डाव टाकणारच-राष्ट्रवादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तिक भेट झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तुम्ही हो-की नाही ते सांगा असं विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सविस्तर उत्तर दिलं ते म्हणाले की मी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलो आहे. नवाज शरीफ यांना नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलो त्यात गैर काय?असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT