बारामतीचा रिक्षावाला Viral Videoवर काय म्हणतो?
बारामती: बारामतीतल्या एका रिक्षा चालकाने लावणीवर केलेल्या भन्नाट डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हीडिओने अवघ्या दोन दिवसात लाखो लाईक्स मिळविल्या आहेत. या व्हीडिओने रिक्षा चालक देखील प्रचंड लोकप्रिय झाला आहे. बाबजी कांबळे असे या रिक्षा चालकाचे नाव असून याच व्हीडिओबाबत बाबाजी कांबळे याने ‘मुंबई तक’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मला […]
ADVERTISEMENT

बारामती: बारामतीतल्या एका रिक्षा चालकाने लावणीवर केलेल्या भन्नाट डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हीडिओने अवघ्या दोन दिवसात लाखो लाईक्स मिळविल्या आहेत. या व्हीडिओने रिक्षा चालक देखील प्रचंड लोकप्रिय झाला आहे. बाबजी कांबळे असे या रिक्षा चालकाचे नाव असून याच व्हीडिओबाबत बाबाजी कांबळे याने ‘मुंबई तक’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं माझा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल.’ असं यावेळी बाबाजी म्हणाला. (what said baramati auto rickshaw driver babaji kamble on viral video)
गेल्या अनेक वर्षांपासून बाबाजी कांबळे हा बारामती शहरात रिक्षा चालक म्हणून काम करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी केलेला लावणी डान्स एखाद्या डान्सरलाही लाजवेल असा आहे. या रिक्षावाल्याचा डान्सने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
‘म्हटलं काही तरी वेगळं करु, पण स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण एवढं फेमस होऊ’
‘टाइमपास म्हणून व्हिडिओ शूट केला होता रिक्षावाल्यांनी. पण एवढा व्हिडrओ व्हायरल होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गुरुवारी आम्ही माळेगावच्या गॅस पंपावर गेलो होतो. तिथे पंपावर लाइट गेली होती. तर आम्ही विचारलं त्याला की, किती वेळ लागेल? तर तो म्हणाला तीन तास लागतील. आता आमच्या गाडीतील गॅस संपला होता. त्यामुळे आम्ही माघारी देखील येऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही तिथेच थांबून राहिलो. त्यानंतर आम्ही तिथेच गाणी ऐकत बसलो होतो. त्यावेळी मी म्हटलं की, एवढी पोरं आहेत. म्हणजे 25-30 रिक्षाचालक आहेत तर जरा काही तरी वेगळं करु. म्हणून आम्ही रिक्षातच एक लावणी लावली. लावणी लावल्यानंतर मी डान्स करायला सुरुवात केली. टाइमपास म्हणून मी डान्स केला. रिक्षावाल्यांनी सगळ्यांनी माझा व्हिडिओ शूट केला. रस्त्यावरुन जाणारे जे लोकं होते त्यांनी व्हिडिओ शूट केला होता. पण माझा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.’ अशी प्रतिक्रिया बाबाजी कांबळेने दिली आहे.