देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना कोणता पेनड्राईव्ह दिला?- काँग्रेस
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या 6.3 जीबी पेनड्राईव्हचा उल्लेख करत आरोप केला त्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. फडणवीस यांनी दाखवलेला पेन ड्राईव्ह अहवालासोबत देण्यातच आला नव्हता. सीताराम कुंटेंनीही हेच सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस यांनी कोणता पेन ड्राईव्ह केंद्रीय गृहचिवांना दिला? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. सीताराम […]
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या 6.3 जीबी पेनड्राईव्हचा उल्लेख करत आरोप केला त्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. फडणवीस यांनी दाखवलेला पेन ड्राईव्ह अहवालासोबत देण्यातच आला नव्हता. सीताराम कुंटेंनीही हेच सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस यांनी कोणता पेन ड्राईव्ह केंद्रीय गृहचिवांना दिला? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
सीताराम कुंटेंनी रश्मी शुक्लांबाबत ठाकरे सरकारला दिलेल्या अहवालाबाबत फडणवीसांचा नवा आरोप
देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून जे काही आरोप महाविकास आघाडी सरकार करतं आहे ते जाणीवपूर्वक करत आहेत. भाजपने आत्तापर्यंत केलेले आरोप हे बेफाम आणि कोणत्याही पुराव्यांशिवाय केले होते. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे ठरले आहेत, याआधी फडणवीस असोत किंवा इतर नेते असोत त्यांनी महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आहेत अशी प्रतिक्रिया आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हे वाचलं का?
काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..
विधीमंडळ अधिवेशनानंतर जे काही आरोप भाजपकडून केले जात आहेत यामागे भाजपचं षडयंत्र आहे. त्यांनी अनेक प्रकरणांचा संबंध सरकारशी जोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते तोंडघशी पडले आहेत. सातत्याने गोलपोस्ट चेंज करत आहेत, रोज आरोप केले जात आहेत. अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुद्दा हा मुख्य होता. दुसरी बाब होती परमबीर सिंग यांच्या पत्राची होती. तिसरा आरोप त्यांनी केला तो रश्मी शुक्लांच्या अहवालाबाबत. परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये म्हणून आणि मूळ मुद्दा बाजूला करण्यासाठी या आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या का? असाही प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० मध्ये अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं. एक कारण दाखवलं आणि दुसऱ्या कारणासाठी फोन टॅपिंग केलं आहे. मात्र मागच्या आठ महिन्यांत भाजपला या सगळ्याचा विसर पडला होता. त्यामुळे ते याबद्दल काहीही बोलले नाहीत. त्यानंतर रश्मी शुक्लांच्या अहवालावर जो अहवाल सीताराम कुंटे यांनी सादर केला त्यामुळे विरोधकांचा आवाज बंद झाला आहे असंही सचिन सवांत यांनी म्हटलं आहे. सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्लांच्या अहवालानंतर आणि फोन टॅपिंगवरून जो अहवाल दिला आहे त्यामुळे विरोधकांची तोंडं बंद झाली आहेत असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT