आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा ‘तो’ माणूस कोण?; NCB म्हणते हा तर…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजातून ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्यानंतर त्याला काल (3 ऑक्टोबर) एनसीबीकडून अधिकृतरित्या अटक करण्यात आली होती. मात्र, यानंतर आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अटकेत असलेल्या आर्यनसोबत सेल्फी घेत असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, […]
ADVERTISEMENT
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजातून ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्यानंतर त्याला काल (3 ऑक्टोबर) एनसीबीकडून अधिकृतरित्या अटक करण्यात आली होती. मात्र, यानंतर आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अटकेत असलेल्या आर्यनसोबत सेल्फी घेत असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, हा व्यक्ती नेमका कोण? याविषयी आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. एकीकडे आर्यनवर अटकेची कारवाई सुरु असताना दुसरीकडे आर्यनसोबत घेण्यात आलेल्या सेल्फीनंतर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण?
एनसीबीने सुरुवातीला ताब्यात घेतलेल्यांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश होता. आर्यन खानला एनसीबीने तासनतास चौकशी केल्यानंतर अटक केली. या सगळ्या दरम्यान, आर्यन खान याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. पण त्याचबरोबर एका अज्ञात व्यक्तीचा एक सेल्फी देखील त्यावेळी व्हायरल होत होता
हे वाचलं का?
आर्यनच्या या फोटोवरुन हे स्पष्ट होतं की, तो मुंबईतील एनसीबी कार्यालयात बसला होता. त्याला पाहून असं वाटत की, तो कोणत्याही क्षणी रडू शकतो. तर दुसरीकडे त्याच वेळी सेल्फी घेणारा व्यक्ती हा मात्र हसत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, एनसीबी कार्यालयात सेल्फी घेणारा हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण?
काही जणांना असं वाटत होतं की, तो एनसीबीचा अधिकारी असावा. त्यामुळे सुरुवातीला अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते की, जर सेल्फी घेणारा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असेल तर आर्यनसोबत ते सेल्फी का घेतला असेल? एक अधिकारी एवढ्या महत्त्वाच्या क्षणी असा का वागला असेल? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले जात होते.
ADVERTISEMENT
पाहा ‘त्या’ सेल्फीवर एनसीबीने काय दिलं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT
दरम्यान, या सेल्फीबाबतचा वाद वाढत असल्याने एनसीबीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एनसीबीकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आणि त्यात असं सांगण्यात आलं की, ‘NCB हे स्पष्ट करते की आर्यन खानसोबत सेल्फीमध्ये दिसणारी व्यक्ती ही काही NCB चा अधिकारी किंवा कर्मचारी नाही.’
Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi
— ANI (@ANI) October 3, 2021
दरम्यान, असं असलं तरीही एनसीबीच्या कार्यालयात एक अज्ञात व्यक्ती घुसून थेट आर्यन खानसोबत सेल्फी कसा काय घेऊ शकतो? त्यावेळी एनसीबीचे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी नेमके काय करत होते? यासारखे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. तसंच आता 24 तास उलटून गेलेले असताना देखील सेल्फी घेणारी ‘ती’ व्यक्ती कोण? याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
SRK’s Son: मोठी बातमी: आर्यन खानच्या अडचणीत प्रचंड वाढ, 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यनला NCB कोठडी
रविवारी दुपारी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबीने काही तासांच्या चौकशीनंतर अटक केली. संध्याकाळी न्यायालयात हजर झाल्यानंतर तिघांना एक दिवस कोठडीत ठेवण्याचा निर्णय देण्यात आला. आर्यनने एनसीबीसमोर कबूल केले आहे की तो ड्रग्सचे सेवन करतो. आता याप्रकरणी कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु असून एनसीबीकडून आरोपींच्या कोठडीची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT