उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना अडचणीत आणणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण? जाणून घ्या…

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

केंद्रीय तपासयंत्रणा विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक अंक मंगळवारी समोर आला. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट सील केले आहेत. Pushpak bullion कंपनीच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं कळतंय. या प्रकरणात सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याचं नावही समोर आलं आहे. प्राथमिक चौकशीत चतुर्वेदी याची बोगस कंपनी हमसफर डिलर्सने श्रीधर पाटणकर यांच्या फर्मला Unsecure Loan दिल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

या माध्यमातून मनी लाँड्रींग झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे आणि याचमुळे मंगळवारी ईडीने पाटणकर यांच्याविरुद्ध कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल

हे वाचलं का?

कोण आहे नंदकिशोर चतुर्वेदी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुर्वेदी हा उत्तर प्रदेशातील मथुरा इथला रहिवासी आहे. पेशाने चतुर्वेदी हा CA आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नंदकिशोर चतुर्वेदीने छोट्या-मोठ्या उद्योगपतींना financial planning मध्ये मदत करायला सुरुवात केली. यानंतर हळुहळु चतुर्वेदीने बोगस कंपन्यांच्या एन्ट्री या उद्योगपतींना मिळवून देण्यास सुरुवात केली. या धंद्यातील खाचा कळल्यानंतर चतुर्वेदीने स्वतः बोगस कंपन्या तयार करुन एन्ट्रीच्या मोबदल्यात जोरदार आर्थिक मोबदला मिळवण्यास सुरुवात केली. २००० सालापर्यंत त्यांच्या गिऱ्हाईकांमध्ये मोठी वाढ झाली आणि हळुहळु चतुर्वेदी राजकीय पक्षाशी संबंधित लोकांची मदत करायला लागला.

ADVERTISEMENT

२०१७ साली Pushpak bullion case प्रकरणात चतुर्वेदीचं नाव पहिल्यांदा समोर आलं.

ADVERTISEMENT

‘ईडी’ची छापेमारी वाढली! यूपीए सरकारच्या काळात ११२, तर मोदी सरकारच्या काळत २,९७४ धाडी

उत्तरेकडील राज्यातील दोन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेता व त्याच्या परिवाराशी संबंधित लोकांना मनी लाँड्रींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करुन देण्यासंबंधी चतुर्वेदीचा हात असल्याचं समोर आलं आहे. यासाठी ईडीचे अधिकारी चतुर्वेदीच्या शोधात आहेत. ईडीने नंदकिशोर चतुर्वेदी विरोधात लूक आऊट नोटीसही जाहीर केल्याचं कळतंय. याचसोबत अनेक प्रकरणांमध्ये चतुर्वेदीचा ईडीला तपास करायचा असल्याचं कळतंय. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून केलेले आर्थिक व्यवहार आणि मनी लाँड्रींगसाठी ईडीसोबतच आयकर विभाग आणि अन्य यंत्रणाही चतुर्वेदीच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नंदकिशोर चतुर्वेदीने कोलकाता शहरात बोगस कंपन्यांचं एक जाळं तयार केलं आहे. या बोगस कंपन्या जवळपास १५० च्या घरात असल्याचं कळतंय. या कंपन्यांच्या माध्यमातूनच चतुर्वेदी आपला व्यवहार करत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर हवाला ऑपरेटरप्रमाणे चतुर्वेदी हा आपल्या ग्राहकांना फक्त एन्ट्री आणि इनव्हॉईस इतक्याच गोष्टी पुरवत नाही, तर तो आपल्या पद्धतीने पैश्यांची देवणाघेवाण कागदपत्रांच्या माध्यमातून अशा पद्धतीने करतो की समोरच्या ग्राहकाला मिळणारा पैसा हा कायदेशीर मार्गाने मिळाल्याचं तपासयंत्रणांना वाटतं.

या व्यवहारांमधून चतुर्वेदीला मिळणारा नफा तो उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये आपल्या नेटवर्कमध्ये पुन्हा गुंतवतो अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत ईडीने चतुर्वेदीला पकडण्यासाठी अनेक छापे टाकले परंतू तो त्यांच्या हातात आलेला नाहीये. नंदकिशोर चतुर्वेदी ईडीच्या हातात लागल्यास त्याचे देशातील राजकीय पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध, कॉर्पेरेट जगत आणि बिझनेस जगतातील अनेक गोष्टी समोर येतील असा ईडीला विश्वास आहे.

शिवसेनेच्या आणखी सहा नेत्यांचे घोटाळे समोर येणार; सोमय्यांकडून ठाकरेंची कोंडी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT