एका टांगेवाल्याने MDH मसाल्याची केली होती सुरुवात; आज जगभरातून मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

New MDH Masala Ad : एक लोकप्रिय मसाल्याचा ब्रँड म्हणजे महाशियन दी हत्ती (MDH), ज्याचे संस्थापक धर्मपाल गुलाटी होते. टीव्ही जाहिरातींनी धरमपाल गुलाटी यांना देशात एक वेगळी ओळख दिली होती. डोक्यावर पगडी घालून आणि मोठ्या मिशा ठेवून ते त्यांच्या मसाला ब्रँड MDH चा प्रचार करत होते. त्यांची प्रतिमा जवळपास सर्वांच्याच मनावर उमटली होती. श्री. धरमपाल गुलाटी यांची आज 100 वी जयंती आहे. डिसेंबर 2020 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ‘MDH अंकल’, ‘दादाजी’, ‘मसाला किंग’ आणि ‘किंग ऑफ स्पाइस’ अशी त्यांची ओळख होती.मसाला किंग धरमपाल गुलाटी यांनी एका छोट्या दुकानातून मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचे मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतर केले.

ADVERTISEMENT

Ratan Tata : हेवा वाटेल असं यश मिळवलं, मग प्रेमातच का ठरले अपयशी?

MDH च्या जाहिरातींमध्ये कोण दिसतंय?

धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर MDH ब्रँडचा वारसा सांभाळणे कठीण काम होते. यासोबतच ब्रँडच्या जाहिरातींमध्ये गुलाटी यांची जागा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. MDH च्या अलीकडच्या जाहिराती पाहिल्या असतील तर त्यात एक नवीन चेहरा दिसतो. MDH स्पाइसेसच्या नवीन जाहिरातींमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून धरमपाल गुलाटी यांचा मुलगा राजीव गुलाटी आहे. एमडीएच मसाल्यांच्या नव्या जाहिरातीत ते दिसत आहेत.

राजीव गुलाटी यांनी कामकाज सांभाळले

धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर MDH चा व्यवसाय त्यांचा मुलगा राजीव गुलाटी हे सांभाळत आहे. आज MDH भारतातील ब्रँडेड मसाल्यांचे सर्वात मोठे उत्पादक आणि विक्रेते आहे. MDH च्या टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये घराघरात नाव आणि चेहरा बनलेल्या धरमपाल गुलाटीने कंपनीला या टप्प्यावर नेले. कंपनी आता आपले मसाले अमेरिका, कॅनडा, युरोप, युनायटेड किंगडम, दक्षिण पूर्व आशिया, जपान आणि युनायटेड स्टेट्समध्ये निर्यात करते.

हे वाचलं का?

Mukesh Ambani आणि नीता अंबानी यांची रोमँटिक लव्हस्टोरी, ‘अशी’ झालेली पहिली भेट…

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत MDH वितरित केले

राजीव गुलाटी हे MDH चे संस्थापक आणि माजी CEO धरमपाल गुलाटी यांचे पुत्र आहेत. ते दीर्घकाळापासून कंपनीशी संबंधित आहेत आणि मसाला ब्रँड यूएस, कॅनडा, यूके आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याचे श्रेय त्यांना जाते. शारजाहमध्ये कंपनीच्या नवीन उत्पादन युनिटची स्थापना करण्यात राजीव गुलाटी यांचाही मोलाचा वाटा होता. राजीव गुलाटी सध्या MDH चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. वडील धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर त्यांनी एमडीएचचा व्यवसाय हाती घेतला आहे.

ADVERTISEMENT

फाळणीच्या वेळी धरमपाल गुलाटी भारतात आले

धरमपाल गुलाटी यांचा जन्म 1927 मध्ये पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. 1919 मध्ये त्यांच्या वडिलांनी सियालकोटमध्ये मसाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. धरमपाल गुलाटी लहान वयातच आपल्या वडिलांच्या छोट्या मसाल्याच्या दुकानात रुजू झाले. इयत्ता पाचवी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर 1947 मध्ये फाळणीच्या वेळी ते भारतात आले. तेव्हा त्याच्या खिशात फक्त 1500 रुपये होते.

ADVERTISEMENT

रतन टाटा देवमाणूस

करोलबागमध्ये पहिले दुकान उघडले

सुरुवातीला त्यांनी उदरनिर्वाहासाठी काही छोट्या नोकऱ्या केल्या. 650 रुपयांना एक टांगा खरेदी करून, त्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि कुतुब रोड दरम्यान टांगा देखील चालवला. अशा प्रकारे पैसे जोडून त्यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये त्याच नावाने एक दुकान उघडले, ज्या नावाने त्यांचे कुटुंब सियालकोटमध्ये व्यवसाय करत होते. तेथून एमडीएचची सुरुवात झाली. 1959 मध्ये, MDH ची कंपनी म्हणून नोंदणी झाली.

आज त्यांचे भारत आणि दुबईमध्ये 18 मसाल्यांचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये तयार होणारे MDH मसाले जगभरात पोहोचतात. MDH मध्ये 62 उत्पादने आहेत. कंपनीचा दावा आहे की उत्तर भारतात 80 टक्के मार्केट शेअर आहे.

मुकेश अंबानींचे शेफही मालदार! घेतात आमदारांपेक्षाही जास्त पगार; कमाई वाचून व्हाल हैराण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT