सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच असं का वाटतंय भाजपला?: मुख्यमंत्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘जणू काही सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत. अशा पद्धतीने त्यांना जे काही वाटतंय ते कशासाठी?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. आज (10 मार्च) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सचिन वाझे यांच्याबाबत बोलताना त्यांचा बचाव केला.

ADVERTISEMENT

सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहेत का?: मुख्यमंत्री

‘हिरेन प्रकरण ज्याप्रकारे आहे तसंच मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यातील काही जणांची नावं ही सभागृहात सांगितली आहेत. आता मुद्दा काय येतो तपास सुरु झाला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत असं करता कामा नये की, आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा. ही काही तपासाची पद्धत असू शकत नाही.’

हे वाचलं का?

‘तपासाला दिशा देण्याचं काम तुम्ही करु शकत नाही. तपास हा निपक्षपातीपणे झाला पाहिजे. त्यामुळे ही नवी पद्धत आलेली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि पूर्ण चारित्र्यहनन केल्यानंतर तपासात समोर आलं की, त्यामध्ये तो दोषीच नाही… तर मग? त्यामुळे आमचं काय म्हणणं आहे तपास सुरु आहे त्या तपासात जो कोणी असेल त्याच्यावर हे सरकार कारवाई करेल.’

महाराष्ट्र ATS ची सचिन वाझेंवर नजर,’त्या’ टाटा सुमोचं कोडं उलगडलं

ADVERTISEMENT

‘हिरेन यांच्या मृत्यूची बाब ही आम्ही गांभीर्याने घेतलेली आहे. परंतु जे चित्र निर्माण केलं जातंय की, जणू काही सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत. अशा पद्धतीने त्यांना जे काही वाटतंय ते कशासाठी? तपासात जो दोषी सापडेल त्याला दयामाया दाखवली जाणार नाही. पण आधी तपास तर पूर्ण होऊ द्या.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवरच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘सचिन वाझे काही शिवसेनेच मंत्री नाहीत’

दरम्यान, यावेळी डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला. ‘सचिन वाझे हे पूर्वी कधीतरी शिवसेनेत होते. 2008 ला वैगरे असतील. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही सदस्यत्व रिन्यूव केलेलं नाही. त्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काहीही थेट संबंध नाही.’

‘हाच माझा मुद्दा आहे. हिरेन यांचा मुद्दा त्यांनी लावून धरला आहे, तो लावून धरलाच पाहिजे. पण डेलकरांचा जो विषय आहे. त्यात ज्या प्रशासकांचं नाव समोर आलं आहे ते तर गुजरातमध्ये त्यांचे मंत्री होते. तसे सचिन वाझे हे काही आमचे मंत्री वैगरे नाहीत किंवा कोणी नेताही नाही. मला हेच विचारायचं आहे की, सचिन वाझेलाच का टार्गेट करत आहात? तर त्या एकाला घरातून आरोपी म्हणून उचलून नेलं यासाठीच?’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डाव उलटवण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT