Aamir Khan : अवार्ड-शो आणि कॅमेऱ्यासमोर फार का दिसत नाही अमिर खान? नाना पाटेकर यांना म्हणाला मला...
आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो अवॉर्ड फंक्शन्समध्ये येण्याचं का टाळतो हे सांगताना दिसतोय.

बातम्या हायलाइट

अमिर खान पुरस्कार वितरण सोहळ्या का दिसत नाही?

नाना पाटेकर यांच्या प्रश्नााला अमिर खानने काय उत्तर दिलं?
Amir Khan on Award Show : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. मात्र, तो लवकरच 'सीतारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. आमिर कायमच प्रसिद्धीपासून दूर राहतो, कॅमेऱ्यासमोर येणं टाळतो असं दिसतं. कोणत्याही पार्टी किंवा अवॉर्ड फंक्शनमध्येही तो दिसत नाही.
आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो अवॉर्ड फंक्शन्समध्ये येण्याचं का टाळतो हे सांगताना दिसतोय. नाना पाटेकर यांच्याशी संवाद साधताना आमिर म्हणाला, हे खूप व्यक्तिनिष्ठ आणि सर्जनशील क्षेत्र आहे. बॉल रेषेच्या बाहेर किंवा आत असायला हा काही टेनिसचा सामना नाही. किंवा ही शर्यतही नाही, की एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगाने धावेल आणि हा पहिला आणि हा दुसरा होईल.
हे ही वाचा >> Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा ED ला मोठा दणका! लॅपटॉप, मोबाईल जप्त करुन डेटा...
"तर मग आपण कुणाला चित्रपटात पहिला किंवा दुसरा कसं म्हणू शकतो? कारण चित्रपटाच्या कथा वेगवेगळ्या असतात. तुम्ही 'परिंदा' केला, मी 'कयामत से कयामत तक' केला. आम्ही आमच्या अभिनयाची तुलना कशी करू शकतो. मला असं वाटतं, आपण भारतीय खूप भावनिक आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा पुरस्कार देण्याची वेळ येते तेव्हा आपण व्यक्तीला पुरस्कार दोतो, कामाला देत नाही. पण याच्या उलट होणं अपेक्षित आहे. व्यक्ति कुणीही असो, त्याचं नाव काहीही असो, त्याच्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. पण आपण भारतीय म्हणून ते करू शकत नाही किंवा करत नाही. आपल्याला वाटतं नको यार त्याला वाईट वाटेल, म्हणून आपण ते नाही करू शकत" असं म्हणत अमिर खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नाना पाटकर काय म्हणाले?
भाजप आमदाराच्या मामीनेच काढला मामाचा काटा, 'या' कारणामुळे संपवलं पतीला!
नाना पाटेकर म्हणाले, माझी अडचण अशी आहे की जे 5-6 लोक ज्युरीमध्ये आहेत. त्यापैकी 3-4 जणांशी माझं भांडण झालेलं आहे, त्यामुळे मी जरा वेगळे वागतो. नाना पाटेकरांचे हे म्हणणं ऐकून आमिर खान हसला.
दरम्यान, आमिर खान शेवटी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला फार यश मिळालं नव्हतं.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे अमिरचा येणारा चित्रपट किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.