बायकोने फक्त सांगितलं दारु पिऊ नका.. वाचा नवऱ्याने नेमकं काय केलं!
भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या फाजिल्का येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अतिशय क्षुल्लक कारणासाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी अनेकदा पतीला दारू पिऊ नये यासाठी रोखायची. याच गोष्टीवरुन पती पत्नीमध्ये अनेकदा टोकाचे वाद देखील व्हायचे. कधी-कधी पती आपल्या पत्नीला घराबाहेर देखील काढायचा. मृत महिलेचा भाऊ चरणजीत सिंह याने तक्रार दाखल करताना पोलिसांना सांगितले […]
ADVERTISEMENT

भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या फाजिल्का येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अतिशय क्षुल्लक कारणासाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी अनेकदा पतीला दारू पिऊ नये यासाठी रोखायची. याच गोष्टीवरुन पती पत्नीमध्ये अनेकदा टोकाचे वाद देखील व्हायचे. कधी-कधी पती आपल्या पत्नीला घराबाहेर देखील काढायचा.
मृत महिलेचा भाऊ चरणजीत सिंह याने तक्रार दाखल करताना पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात मेव्हण्यासोबतच त्याचा पुतण्या आणि मेव्हण्याचा भाऊ देखील सहभागी आहेत. सध्या पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून महिलेचा पती, पुतण्या आणि पतीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेची हत्या तिघांनी मिळून केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच या सगळ्यांना अटक केली जाईल.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. वेरो पोलिस स्टेशनचे एसएचओ हरप्रीत सिंह यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल आणि हत्येमागील खरे कारणही कळेल.
अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी देऊन केली हत्या