महाराष्ट्रात 1 जूननंतरही Lockdown कायम राहणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी 14 एप्रिलपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाला. तो आधी 1 मेपर्यंत होता. त्यानंतर तो 15 मे आणि नंतर 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. अशात आता 1 जूनच्या पुढेही महाराष्ट्रात लॉकडाऊन असणार का? हा प्रश्न आज अजित पवार यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

आज 21 मे आहे, 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण लॉकडाऊन कायम ठेवला आहे. लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचं याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आणखी दहा दिवस आपल्या हातात आहेत. त्यानंतर काय निर्णय करायचा ते पाहू असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीसाठी ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातला Lockdown 1 जूनपर्यंत वाढला, ठाकरे सरकारचे आदेश

म्युकरमायकोसिस बाबत काय म्हणाले अजित पवार?

ADVERTISEMENT

म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यासाठी लागणार्या औषधांचा मात्र तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही त्या कंपन्यांना संपर्क केला. मात्र त्या कंपन्यांनी सांगितले की आधी ठरल्याप्रमाणे त्यांना तयार होणारी इंजेक्शन्स ही आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत. केंद्र सरकारच ठरवणार आहे की कुठल्या राज्याला किती इंजेक्शन्स द्यायची.

ADVERTISEMENT

देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालंय. पण लसीकरणाचा पुरवठा जेवढा व्हायला हवा तेवढा होत नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणं सुरू आहे. सीरम आणि भारत बायोटेक लस निर्मितीचे प्रमाण वाढवत आहेत.

पंतप्रधानांचा दौरा आधी असा आला होता की आधी ते मुंबईत येणार आणि त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र नंतर त्यांचा मुंबई दौरा रद्द केला आणि ते फक्त गुजरातला गेले आणि त्यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्र देखील भारतातच आहे. पंतप्रधान जर मुंबईत आले असते तर इथल्या लोकांनाही बरं वाटलं असतं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT