महाराष्ट्रातला Lockdown संपेल का? कोरोनाची स्थिती काय? डॉ. राहुल पंडित यांनी दिलं उत्तर
देशभरात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली. त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रातही झाली, देशभरात कोव्हिडचा सर्वाधिक फटका बसला तो महाराष्ट्राला. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू करून महिना होऊन गेला आहे. 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढेल अशी चर्चा आहे. अशात आता महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काय आहे? हा लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल याचीही चर्चा लोक करत आहेत. या आणि अशा विविधी प्रश्नांची उत्तरं […]
ADVERTISEMENT

देशभरात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली. त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रातही झाली, देशभरात कोव्हिडचा सर्वाधिक फटका बसला तो महाराष्ट्राला. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू करून महिना होऊन गेला आहे. 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढेल अशी चर्चा आहे. अशात आता महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काय आहे? हा लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल याचीही चर्चा लोक करत आहेत. या आणि अशा विविधी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत डॉ. राहुल पंडित यांनी. डॉ. राहुल पंडित हे महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य तर आहेतच पण शिवाय सुप्रीम कोर्टाने जो राष्ट्रीय ऑक्सिजन टास्क फोर्स तयार केला आहे त्याचेही ते सदस्य आहेत.
आपण जाणून घेऊया त्यांनी महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीबद्दल आणि लॉकडाऊन बाबत काय भाष्य केलं आहे?
महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास महिना होत आला. आता मुंबईतली स्थिती सुधारते आहे, महाराष्ट्रातल्याही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती सुधारते आहे. अशात लॉकडाऊन उठवण्याची वेळ आली आहे असं वाटतं का?
डॉ. राहुल पंडित – लॉकडाऊन लावायाचा निर्णय ज्याप्रमाणे घेणं कठीण असतं अगदी त्याचप्रमाणे लॉकडाऊन उठवणं हा निर्णय घेणं. कारण अनलॉक झालं की लोक पुन्हा बाजारात जाणार, गर्दी करणार त्यातून त्यांना कोरोना संसर्गाचा धोका असतोच. त्यामुळे स्मार्ट अनलॉकिंग हा पर्याय आहे. महाराष्ट्र सरकारने जे अनलॉकिंगचे जे निर्णय घेतले ते हळूहळू घेतले. आत्ताही तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील याची मला खात्री आहे. गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन आहे, सरकार अनलॉकिंगचाही विचार करतं आहे मात्र त्याबद्दल निश्चित अशी एक दिशा ठरवावी लागेल. पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरू झाल्या होत्या तशाच या लाटेतही करण्यात येतील. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण अजूनही कमी झालेले नाहीत त्यामुळे अनलॉकिंगचा निर्णय हळूहळू घेतला जाईल.










