महाराष्ट्रात Lockdown वाढणार की नाही?, थोड्याच वेळात समजणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) लागू केलेला लॉकडाऊन (Lockdown) हा 1 जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे आता हा लॉकडाऊन आणखी वाढणार की नाही? याबाबत आज (27 मे) निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कारण सरकारने जारी केलेला लॉकडाऊन संपण्यासाठी आता अवघे चार-पाच दिवस शिल्लक आहेत. अशावेळी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (state cabinet meeting) होणार असून त्या बैठकीत लॉकडाऊनबाबत नेमका निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय होणार हे आपल्याला थोड्याच वेळात समजू शकतं.

ADVERTISEMENT

Break The Chain च्या अंतर्गत कठोर निर्बंध 1 जूनपर्यंत लागू आहेत. Break The Chain च्या अंतर्गत कठोर निर्बंध हे 14 एप्रिलपासून लावण्यात आले होते. त्यानंतर 15 मेपर्यंत त्या निर्बंधाना मुदतवाढ देण्यात आली. आता 1 जूनपर्यंत कायम असणारे हे निर्बंध शिथील केले जाणार का? याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिवभोजन थाळी 14 जून 2021 पर्यंत मोफत!, म्हणजे लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ?

हे वाचलं का?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कोणकोणते नियम लागू आहेत?

  • ठाकरे सरकारने आता लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले आहेत बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांना RTPCR टेस्ट बंधनकारक असणार आहे.

ADVERTISEMENT

  • महाराष्ट्रात प्रवेश करताना RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही, प्रवेश घेण्याच्या 48 तास आधी हा रिपोर्ट असणं आवश्यक आहे

  • ADVERTISEMENT

  • देशातल्या कोणत्याही भागातून येणाऱ्या लोकांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

  • कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशा दोघांनाच समंती असणार आहे, जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून येणार असेल तर ड्रायव्हर आणि क्लिनर अशा दोघांचाही आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणं आवश्यक असणार आहे. तसंच दोघांची चाचणी ४८ तास आधी होणं आवश्यक आहे

  • Shiv Bhojan Thali: महाराष्ट्रात मोफत शिवभोजन थाळी कुठे-कुठे मिळणार?, हॉटेलचं नाव, पत्ता सगळं काही एका क्लिकवर

    लग्न समारंभ

    लग्न समारंभासाठी आता हॉलमध्ये फक्त दोन तासांसाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थित राहता येईल. जर एकाही कुटुंबाने लग्न समारंभाचा हा नियम मोडला तर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जाईल. लग्न समारंभाला हजर राहतानाही कोव्हिड 19 प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक

    वाहतूक विषय नियमांमध्ये बदल

    • खासगी प्रवाशांना फक्त तातडीच्या कारणासाठी किंवा अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करता येईल. बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रवाशांना मुभा.

    • प्रवाशाला त्याच्या मूळ गावी जायचं असेल तर त्यांना प्रवासाची मुभा आहे. मात्र अत्यावश्यक कारणासाठीच गावी जाता येईल. फिरण्यासाठी गावी जाण्याची किंवा इतर कुठे प्रवास करण्याची मुभा नाही

    • अंत्यविधी किंवा त्या कारणाइतकं तातडीचं कारण असेल तर प्रवास करण्याची मुभा आहे, आवश्यक सेवा किंवा तातडीचं कारण या शिवाय सर्व कारणांसाठी प्रवासावर निर्बंध आहेत जर या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर 10 हजारांचा दंड घेतला जाईल

    • खासगी बसेसनाही त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी नेण्याची मुभा देण्यात आली आहे.

    सार्वजनिक प्रवासी वाहतूक

    • उपरोक्त कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो या तिन्ही मार्गांनी प्रवासाची मुभा

    • सर्व सरकारी सेवेतील कर्मचारी(राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक सरकारी कर्मचारी). या सगळ्यांनाच तिकिट किंवा पास दिला जाईल. त्यासाठी सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.

    • वैद्यकीय सेवेत काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन्स, हॉस्पिटल आणि मेडिलक क्लिनिक स्टाफ यांनाही आय कार्ड दाखवून तिकीट किंवा पास दिला जाईल त्यांनाच लोकल, मेट्रो किंवा मोनेने प्रवास करता येईल.

    • ज्या माणसाला वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत खास करून दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला प्रवास करण्याची मुभा

    • बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही, खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू असतील

    • लोकल ट्रेन सामान्यांसाठी पूर्णतः बंद, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आय कार्ड सक्तीचं

    • शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या खासगी बसेससाठी नियम

    • शहरांमध्ये प्रवास करायचा असेल तर दोन पेक्षा जास्त ठिकाणी बस थांबवू नये. या प्रवासाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे

    • जे प्रवासी जिल्ह्यातून बाहेर जातील त्यांच्या ते त्यांच्या इच्छित स्थळी उतल्यानंतर त्यांच्या हातावर 14 दिवस क्वारंटाईन असा उल्लेख असलेला शिक्का मारावा. हे काम ज्या खासगी बसमधून ते प्रवास करत असतील त्या बसच्या ऑपरेटरने करायचे आहे.

    • बस प्रवासाच्या आधी प्रवाशाचं थर्मल स्कॅनिंग आवश्यक आहे, कुणालाही ताप आला असेल तर त्याला तातडीने कोव्हिड सेंटरमध्ये जाण्यास सांगायचं आहे

    • जिल्हाधिकारी हे RAT अर्थात रॅपिड अँटिजेन टेस्ट करू शकतात, या चाचणीचा खर्च ठरवल्याप्रमाणे बस ऑपरेटरने किंवा प्रवाशाने करावा

    • जर कुणीही या नियमांचं उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. तसंच एकपेक्षा जास्त वेळा एखाद्या ऑपरेटरने नियम मोडला तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल

    Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री

    काय-काय बंद असेल?

    • कोरोना कर्फ्यू दरम्यान सिनेमा हॉल, थिएटर, उद्यानं, क्लब, जलतरण तलाव, जिम आणि क्रीडा संकुल बंद राहतील. चित्रपट किंवा मालिकांचे शूटिंग होणार नाही. अशी दुकाने, मॉल्स आणि शॉपिंग मॉल्स देखील बंद केली जातील, जी अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाहीत. स्पा आणि सलून देखील बंद राहतील. बीच किंवा बाग यासारखी सार्वजनिक ठिकाणे देखील उघडणार नाहीत.

    • शाळा व महाविद्यालयेही बंद राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी प्रशिक्षण संस्था देखील बंद राहतील.

    धार्मिक स्थळंही राहणार बंद

    1 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व धार्मिक स्थळही बंद राहतील. म्हणजे आपल्याल घरी राहूनच सगळ्या पूजापाठ करावे लागणार आहेत. दरम्यान, धार्मिक स्थळी काम करणारे कर्मचारी आपले काम नेहमी सरकारने ठरवून दिलेल्या गाईडलाइननुसार सुरु ठेवू शकतात. पण इतर कुणालाही तिथे येण्यास परवानगी नसेल.

    याशिवाय कोणत्याही प्रकारचा धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. जर कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यात 200 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये एकत्र येऊ शकत नाहीत.

    राज्यात लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे. मात्र अजूनही संख्या पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी वाढवले जाणार की त्यामध्ये काही शिथिलता येणार यावर कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT