नवाब मलिक मंदबुद्धी असलेले नेते, यास्मिन वानखेडेचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई तक

नवाब मलिक मंदबुद्धी असलेले नेते आहेत अशी टीका आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेंनी केली आहे. रोज नवाब मलिक सकाळी ट्विटरवर काहीबाही आरोप करतात. कधी माझ्यावर आरोप करतात, कधी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप करतात. त्यांना हे त्यांना आवडतं का? असाही प्रश्न यास्मिन वानखेडे यांनी विचारला आहे. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत तरीही त्यांच्यावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवाब मलिक मंदबुद्धी असलेले नेते आहेत अशी टीका आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेंनी केली आहे. रोज नवाब मलिक सकाळी ट्विटरवर काहीबाही आरोप करतात. कधी माझ्यावर आरोप करतात, कधी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप करतात. त्यांना हे त्यांना आवडतं का? असाही प्रश्न यास्मिन वानखेडे यांनी विचारला आहे. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत तरीही त्यांच्यावर चिखलफेक केली जाते आहे.

यास्मिन वानखेडे आणि एका ड्रग्ज पेडलरसोबतचे काही चॅट आज नवाब मलिक यांनी व्हायरल केले आहेत. याबाबत विचारलं असता त्यांनी या आरोपांना उत्तरं दिली आहेत. यास्मिन वानखेडे म्हणतात त्यांनी सोयीस्कर चॅट्सच ठेवले आहेत आणि आरोप करण्यास सुरूवात केली. माझ्याकडे काही अनेक व्यक्ती त्यांचं गाऱ्हाणं मांडतात. तसंच हे गाऱ्हाणं होतं, त्यातल्या तारखा नवाब मलिक यांनी डिलिट केल्या नसत्या आणि सोयीस्कर तेवढेच चॅट ठेवून मागचे-पुढचे संवाद उडवले नसते त्यांनी पूर्ण चॅट दाखवले असते असंही त्या म्हणाल्या. तसंच त्यांनी मला, अमृता फडणवीस यांना लक्ष्य करणं सोडून द्यावं असंही त्या म्हणाल्या आहेत.

समीर वानखेडे यांच्या कपड्यांवरून, बुटांवरून प्रश्न विचारले जात आहेत. किती लज्जास्पद बाब आहे एक माणूस प्रामाणिकपणे त्याचं काम करतो आहे. तरीही त्या व्यक्तीला लक्ष्य केलं जातं आहे. समीर वानखेडे हे कर भरतात, तुम्ही चौकशी करू शकता. तसंच ते कोणते शर्ट वापरतात, कोणते बूट वापरतात हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तरीही त्यांच्याबाबत असे प्रश्न निर्माण करणं नवाब मलिक यांना शोभत नाही असंही यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे. एक प्रामाणिक अधिकारी चांगले कपडे का घालतो हे पण विचारलं जातं आहे, हा अधिकार नवाब मलिकांना कुणी दिला? असाही प्रश्न यास्मिन यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

हे वाचलं का?

    follow whatsapp