अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून प्रियकराने केली हत्या

मुंबई तक

निलेश पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथील एका लॉजमध्ये महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. प्रियकराने महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भेतील साई प्रणव लॉजवर एक जोडपं 23 फेब्रुवारीला आलं होतं. पण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

निलेश पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथील एका लॉजमध्ये महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. प्रियकराने महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक देखील केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भेतील साई प्रणव लॉजवर एक जोडपं 23 फेब्रुवारीला आलं होतं. पण त्याच रात्री त्याच्यामध्ये जोरजोरात भांडणं सुरु होती. हा संपूर्ण प्रकार पाहून लॉजच्या मॅनेजरने पोलिसांना पाचारण केलं. घटनेची माहिती मिळताच Apmc पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेव्हा पोलीस लॉजमधील रूममध्ये पोहचले तेव्हा तिथे एक महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली.

यावेळी पोलिसांनी तात्काळ महिलेला लगेचच रूग्णालयात दाखल केले. पण तिला डॉक्टारांनी मृत घोषित केलं. कारण रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याचवेळी महिलेसोबत आलेला तरुण हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपणच महिलेचा गळा आवळून तिची हत्याची केल्याची कबुली आरोपी तरुणाने दिली.

खडकपाडा कल्याण येथे वास्तव्यास असणारा हा युवक मयत महिलेसोबत मागील 5 वर्षापासून प्रेमसंबंधात होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करुन कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास Apmc पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp