सातारा : हिरकणी रायडर्स ग्रूपच्या शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू
साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी सातारच्या ९ महिला हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुप माध्यमातून गेल्या होत्या. यापैकी शुभांगी संभाजी पवार (वय ३२) यांचा अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे बाईकवरुन पडून अपघात झाला. या अपघातात टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी १ […]
ADVERTISEMENT
साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी सातारच्या ९ महिला हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुप माध्यमातून गेल्या होत्या. यापैकी शुभांगी संभाजी पवार (वय ३२) यांचा अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे बाईकवरुन पडून अपघात झाला. या अपघातात टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन या महिला तुळजापूर येथे पोहचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा येथील दाभड येथे टँकर सोबत शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाल्या.
या घटनेची माहिती कळताच स्थानिक पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिरकणी रायडर्सना मदत केली. अपघातानंतर शुभांगी पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. या घटनेनंतर साताऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT