दरोडा… बलात्कार! इगतपुरी ते कसारा स्टेशनच्या दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लूट आणि बलात्काराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली. इगतपुरी ते कसारा स्थानका दरम्यान आरोपींनी अक्षरशः धुडगूस घालत क्रूर कृत्य केलं. रेल्वे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

ADVERTISEMENT

शुक्रवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघालेली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते.

नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

हे वाचलं का?

प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. 16 प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर इथेच थांबले नाही, तर त्यांनी पतीसोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

ADVERTISEMENT

कसारा रेल्वे स्थानक आल्यानंतर या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले. मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

प्रकाश पारधी व अर्षद शेख असं या आरोपींची नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून, यामधील सात जण घोटीमध्ये राहतात, तर एक जण मुंबईत राहतो. नशेत त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांची पथकं फरार आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

भंयकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना

‘घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळी न पाहता कल्याण जीआरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची तब्येत स्थिर आहे. आठपैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहे, तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहेे’, असं मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT