लातूर : कीर्ती ऑईल मिलमध्ये पुन्हा दुर्घटना; बॉयलरवरून पडून कामगाराचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लातूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या कीर्ती ऑईल मिलमध्ये झालेल्या दुर्घटनेत पुन्हा एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. बॉयलरच्या वरच्या मजल्यावरून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऑईल मिलमधील आतापर्यंतची ही तिसरी घटना आहे.

ADVERTISEMENT

औसा तालुक्यातील तुंगी येथील रहिवाशी असलेल्या ३१ वर्षीय रामेश्वर ढोक या तरुण कामगारांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. कीर्ती ऑइल मिल मालकाकडून हे प्रकरण उजेडात येऊ नये तसेच या प्रकरणाची वाच्यता कुठेही होऊ नये यासाठी पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेेवाईकांनी केला आहे.

यापूर्वीही घडल्या दुर्घटना…

हे वाचलं का?

लातूरच्या एमआयडीसी परिसरात तेल उत्पादन करणारी मोठी ऑइल मिल आहे आणि यामध्ये कामगारांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. 30 जानेवारी 2017 रोजी याच कीर्ती ऑईल मिलमध्ये एकाच वेळी 9 कामगारांचा सेफ्टी टॅंक साफ करत असताना ऑक्सिजन न मिळाल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सहा महिन्यांपूर्वी देखील एका कामगारांचा मृत्यू झाला होता आणि आज देखील औसा तालुक्यातील तुंगी येथील रहिवाशी असलेल्या रामेश्वर ढोक या कामगाराचा मृत्यू झाला असून, नातेवाईकांत संतापाचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

एमआयडीसी परिसरात असलेल्या कीर्ती ऑइल मिलमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. 9 कामगारांचा मृत्यूच्या घटनेनंतर लातूरचे तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कीर्ती ऑइल मिल मालकाविरोधात कठोर पावले उचलली जातील, असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही कामगारांच्या जीव जाण्याच्या दुर्घटना घडतच आहेत. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचं मयतांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

रामेश्वर ढोक या तरुण कामगारांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईक मिल मालकाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणात मिल मालकाच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून रक्कम देऊन प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT