Yamuna Expressway Accident : नोएडात भीषण अपघात, महाराष्ट्रातील ४ जणांसह ५ जागीच ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Yamuna Expressway Accident : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील बारामती येथील नागरिकांचा समावेश आहे. ४ महिलांसह एका पुरुषाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

ग्रेटर नोएडातील युमना एक्स्प्रेस वेवर गुरूवारी सकाळी बोलेरो आणि डम्परचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथील ५ जण, तर कर्नाटकातील दोघे प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे लोक आग्र्यावरून नोएडाच्या दिशेने चालले होते.

हे वाचलं का?

ग्रेटर नोएडातील जेवर ठाणे हद्दीतील यमुना एक्स्प्रेस वे वरील जेवर टोल नाक्याजवळ बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. पहाटे ५ वाजता ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांना जेवरमधील कैलास रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

ADVERTISEMENT

घटना कशी घडली?

ADVERTISEMENT

नोएडाच्या दिशेने निघालेली भरधाव बोलेरो गाडी जेवर टोल नाक्याजवळ आली. त्यावेळी गाडी समोरच्या डम्परवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. पोलिसांनी डम्पर ताब्यात घेतला.

या भीषण अपघातात मरण पावलेल्या पाच जणांपैकी चौघे बारामतीतील आहेत. चंद्रकांत नारायण बुराडे (वय ६८), सुवर्णा चंद्रकांत बुराडे (वय ५९), मालन विश्वनाथ कुंभार (वय ६८), रंजना भरत पवार (वय ६०), नुवंजन मुजावर (वय ५३) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

नारायण रामचंद्र कोळेकर (वय ४०), सुनीता राजू गस्ते (वय ३५) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी फोनवर सांगितलं की, ‘हाटे ५ वाजता जेवर ठाणे हद्दीत यमुना एक्स्प्रेस वे वर आग्रावरून नोएडाच्या दिशेनं जात असताना जेवर टोल नाक्यापासून ४० किमी अंतरावर माल घेऊन जाणाऱ्या डम्परला (एन०-एचआर ५५ एजे ४३९०) पाठीमागून बोलेरो गाडी (एमएच ४२, के ०१२५) धडकली.’

‘बोलेरो गाडीतून ७ जण प्रवास करत होते. या अपघातात जखमी झालेल्यांना कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चार महिलासह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT