russia Ukraine war : बेलारुसमध्ये चर्चा करण्यास युक्रेननं का दिला नकार?
रशिया-युक्रेनमधील युद्ध संघर्ष टोकाला पोहोचला आहे. कीवचा पाडाव करून युक्रेनमधील सत्तांतरसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन इरेला पेटले आहेत. युक्रेनमध्ये रशियन फौजांनी आता राजधानी कीवला वेढा देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमध्ये प्रचंड वेगाने हालचाली होत असतानाच रशियाने बेलारुसमध्ये चर्चेस येण्याचा प्रस्ताव युक्रेनला पाठवला. त्यावर ‘चर्चेस आहोत, मात्र बेलारुसमध्ये चर्चा करणार नाही’, अशी भूमिका युक्रेननं घेतली आहे. […]
ADVERTISEMENT
रशिया-युक्रेनमधील युद्ध संघर्ष टोकाला पोहोचला आहे. कीवचा पाडाव करून युक्रेनमधील सत्तांतरसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन इरेला पेटले आहेत. युक्रेनमध्ये रशियन फौजांनी आता राजधानी कीवला वेढा देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमध्ये प्रचंड वेगाने हालचाली होत असतानाच रशियाने बेलारुसमध्ये चर्चेस येण्याचा प्रस्ताव युक्रेनला पाठवला. त्यावर ‘चर्चेस आहोत, मात्र बेलारुसमध्ये चर्चा करणार नाही’, अशी भूमिका युक्रेननं घेतली आहे.
ADVERTISEMENT
रशिया-युक्रेन यांच्यात मागील चार दिवसांपासून प्रचंड धुमश्चक्री सुरू आहेत. रशियन लष्कराकडून युक्रेनवर मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले जात असून, प्रचंड जीवित व वित्त हानी सुरू आहे. एकीकडे युक्रेनची राजधानी कीववर रशियन सैन्य चढाई करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे रशियाने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे.
Russian forces pushing into Kharkiv pic.twitter.com/XxV2ah7SQZ
— OSINTtechnical (@Osinttechnical) February 27, 2022
हे वाचलं का?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, रशिया युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, युक्रेनच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहोत. पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह म्हणाले, रशियाचे शिष्टमंडळ आधीच बेलारुसमध्ये पोहोचलं आहे. रशियाच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालयातील उच्च पदस्थांसह इतर प्रतिनिधींचा समावेश आहे. दोन्ही देशातील चर्चा बेलारुसमधील गोमेलमध्ये होऊ शकते, असं पेसकोव्ह यांनी सांगितलं.
रशियाकडून आलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर युक्रेन सकारात्मक भूमिका दर्शवली असली, तरी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलारूसमध्ये चर्चा करण्यास तयार नसल्याचं म्हटलं आहे. सुरूवातीला बेलारूसमधील मिन्स्क शहरात ही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
ADVERTISEMENT
Russia-Ukraine war : युक्रेनला रशियाचा धक्का! ‘नोवा काखोवका’वर कब्जा; खार्किव्हमध्ये घुसखोरी
ADVERTISEMENT
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, जर युद्ध सुरु नसतं, तर बेलारुमची राजधानी मिन्स्कमध्ये चर्चा शक्य होती, आता नाही. युक्रेनबद्दल आक्रमक भूमिका नसलेल्या इतर कोणत्याही देशात चर्चा करण्यास तयार असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
#BREAKING Zelensky says ready for talks with Russia, but not in Belarus pic.twitter.com/uew5fSvJJ7
— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, जर युद्ध सुरु नसतं, तर बेलारुमची राजधानी मिन्स्कमध्ये चर्चा शक्य होती, आता नाही. युक्रेनविरोधी भूमिका नसलेल्या इतर कोणत्याही देशात चर्चा करण्यास तयार असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. बेलारुमधील चर्चेस नकार देताना झेलेन्स्की यांनी रशियाचे सैनिक बेलारूसच्या भूमितून युक्रेनवर हल्ले करत आहेत. अशा वेळी मिन्स्कमध्ये शांती वार्ता होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.
रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात असून, वार रुममध्ये बेलारुसने रशियाची मदत केली आहे. रशियाकडून युक्रेनवर केल्या जात असलेल्या आक्रमणात बेलारुसही सहभागी आहेत. त्यातच युक्रेनवर हल्ला करण्यासाठी बेलारुसने आपल्या भूमिवर आण्विक शस्त्र तैनात करण्याचीही परवानगी रशियाला दिलेली आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये बेलारुस सहभागी असल्याचा दावा करत ब्रिटननं बेलारुसच्या फुटबॉल टीमचा व्हिसा रद्द केलेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT