Zoom fatigue: झूम मीटिंगमुळे येत आहे थकवा, पुरुषांपेक्षा महिलांना जाणवतो अधिक त्रास
मुंबई: कोरोना काळात घरातून काम करण्यावर भर देण्यात आला. (Work from Home) तास दोन तास प्रवास करुन ऑफिस गाठण्यापेक्षा हे बरं असं अनेकांना वाटत होतं. मात्र आता हळहळू या घरातून काम करण्याचे दुष्परिणाम समोर येताहेत. विद्यार्थी, ऑफिसातून काम करणारे यांच्यावर Zoom कॉलमुळे थकवा (Zoom fatigue) येत असल्याचं एका अभ्यासतून समोर आलं आहे. पण त्यापैकी सगळ्यात […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोना काळात घरातून काम करण्यावर भर देण्यात आला. (Work from Home) तास दोन तास प्रवास करुन ऑफिस गाठण्यापेक्षा हे बरं असं अनेकांना वाटत होतं. मात्र आता हळहळू या घरातून काम करण्याचे दुष्परिणाम समोर येताहेत. विद्यार्थी, ऑफिसातून काम करणारे यांच्यावर Zoom कॉलमुळे थकवा (Zoom fatigue) येत असल्याचं एका अभ्यासतून समोर आलं आहे. पण त्यापैकी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हा ताण किंवा थकवा पुरुषांपेक्षा (Men) जास्त महिलांना (Women) जाणवतो असं संशोधकांना आढळलं आहे.
ADVERTISEMENT
या संपूर्ण अभ्यासात 10 हजार माणसांचा अभ्यास करण्यात आला. ज्यात प्रत्येक सात महिलांपैकी एका महिलेला प्रत्येक झूम मिटिंगनंतर सर्वात जास्त त्रास होत असल्याचं समोर आलं. पुरुषांमध्ये हे प्रमाण 20 पुरुषांमध्ये 1 पुरुषाला झूम मिटिंगचा ताण किंवा थकवा जाणवला असं आहे. रिसर्चर्स हा शोध घेताहेत की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिडीओ कॉल किंवा झूम कॉलचा त्रास जास्त का जाणवतोय?
Zoom fatigue and whatapp vision syndrome are new terms of this pandemic pic.twitter.com/kUiVtgmJXz
— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) May 11, 2021
रिसर्चर्सच्या म्हणण्यानुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा हा ताण जास्त जाणवण्याचं कारण हे स्क्रिनवर स्वतःला बघण्यात दडलंय. म्हणजे व्हिडीओ कॉल दरम्यान स्वतःबरोबर इतरांना पाहण्यातून हा त्रास उद्भवला आहे. महिलांमध्ये जाणवणारा हा थकवा स्वतःचा चेहरा बघण्याबरोबरच त्या व्हिडीओ कॉलवर कशा दिसतात याबाबत जास्त जागरुक असण्यामुळे आलं आहे. गेल्या काही दशकांपासून संशोधक याचा अभ्यास करत आहे. याला त्यांनी ‘सेल्फ फोकस्ड अटेन्शन’ असं नाव दिलं आहे. म्हणजे सगळं लक्ष स्वतःकडे असणं यातून हे झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
हे वाचलं का?
‘असं’ आहे Twitter ला टक्कर देणारं Koo App
एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी एका रुममध्ये एक आरसा लावला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या रुममध्ये असलेल्या आरशाचा पुरुषांवर आणि महिलांवर वेगवेगळा परिणाम झाला. जेव्हा हा आरसा रुममध्ये होता तेव्हा महिला पुरुषांपेक्षा जास्त सजग होत्या आणि स्वतःबद्दल विचार करत होत्या. या आरशामुळे महिला जास्त स्वकेंद्री झाल्या होत्या. ज्याचा संबंध नकारात्मक भावनेशी जोडला आणि डिप्रेशनशीही जोडला गेला होता.
ADVERTISEMENT
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार यातून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की झूम कॉलचा परिणाम महिलांवर आरशाप्रमाणेच झाला. महिलांमध्ये झूम मिटिंगमध्ये त्या कशा दिसतात याबाबत त्यांच्या डिजिटल इमेजमध्ये देखील जागरुकता होती. त्यामुळेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता अधिक होती. तसंच झूम कॉलमध्ये त्यांना स्वतःला बघत प्रतिक्रिया द्यायला सांगितलं तेव्हा त्या जास्त विचलित झाल्याचं आढळलं. संशोधकांनी यात अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचं मत मांडलं आहे.
ADVERTISEMENT
हॅप्पी हायपोक्सिया: कोरोनाच्या तरुण रुग्णांसाठी ठरतो सायलेंट किलर!
असो पण, याबाबत एक आनंदाची बातमी ही आहे की हे झूम मिटिंग फटीग किंवा थकवा अत्यंत साध्या आणि सोप्य पद्धतीने दूर करता येईल. त्यासाठी फक्त सेल्फ व्ह्यू बटन बंद करायचं आहे. झूममध्ये यासाठी सोय आहे. तुमचा कॅमेरा बंद न करता तुम्ही तुमची इमेज झाकू शकता. म्हणजेच तुमच्या व्यतिरिक्त इतर लोक तुम्हाला पाहू शकतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT