Sushma Andhare: “कितीही उसनं अवसान आणलं तरीही गुलाबरावजी तुम्ही….”
जळगावातल्या मुक्ताई नगरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र त्यांना या सभेला जाऊच दिलं गेलं नाही. त्या के.पी. पॉईंट या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. तिथून त्या खाली उतरताच मोठ्या प्रमाणावर पोलीस तिथे आले. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांना उद्देशून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]
ADVERTISEMENT

जळगावातल्या मुक्ताई नगरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र त्यांना या सभेला जाऊच दिलं गेलं नाही. त्या के.पी. पॉईंट या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. तिथून त्या खाली उतरताच मोठ्या प्रमाणावर पोलीस तिथे आले. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांना उद्देशून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही अपयशी ठरला आहात असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंना पोलिसांनी केलं नजरकैद
महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अनेक घडामोडीनंतर सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगरची सभा होणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या खासगी वाहनाने पुण्याकडे रवाना झाल्या. त्या पूर्वी त्यांच्यावर भव्य अशी पुष्पपृष्टी करण्यात आली. ज्या पद्धतीने सुरुवात जोरदार झाली होती, त्याचा शेवटही गोड व्हावा म्हणून सुषमा अंधारे यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी पुष्पपृष्टी केली. सुषमा अंधारे यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. रात्री उशिरा त्या पुण्याला गेल्या.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
मी पूर्णपणे जिंकली आहे कितीही जिंकण्याचा आव आणला, उसनं अवसान आणून बेटकुळ्या फुगवण्याचा प्रयत्न केला तरी गुलाबरावजी तुम्ही पैलवान म्हणून तुम्ही सपशेल अपयशी ठरलेले आहात. या शब्दात उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. मुक्ताईनगरची ऑनलाईन सभा घेतल्यानंतर जळगाव येथून सुषमा अंधारे या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जळगाव मधून शिंदे गटात गेलेल्या पाचही आमदारांच्या मतदारसंघात मी बोलणार असं मुंबईला शिवतीर्थ मैदानावर मी जाहीर केलं होतं.. त्यानुसार ज्या कामासाठी मी आले होते ते काम मी फत्ते केले आहे. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. आज त्यांनी जो प्रकार केला तो जळगावकरांना निश्चित आवडलेला नाही..जनतेच्या त्यांची जी थोडीफार उरली सोडली इमेज असेल तीही आता उतरून गेलेली आहे. आणि याचं गुलाबराव पाटील यांनी आत्मचिंतन करावं असे मनत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार घणाघात केला.