तलाठीच्या नजरचुकीने जिवंत वृद्धेची मयत नोंद; नंतर आलं वेगळंच सत्य समोर

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मस्सा(खं) येथील एका वृद्ध महिलेला मयत दाखवल्याने, एकच खळबळ उडाली.
kalamb tahsil office
kalamb tahsil office

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मस्सा(खं) येथील एका वृद्ध महिलेला मयत दाखवल्याने, एकच खळबळ उडाली. त्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या वृद्ध महिलेला संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारं अनुदान देखील बंद झालं होतं. त्यामुळे या महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र आपल्याकडून नजरचुकीने मयत असल्याची नोंद झाल्याचे अहवाल तलाठी महादेव वाघ यांनी आपल्या वरिष्ठांना तात्काळ दिल्याचे सांगितले.

नेमका काय आहे प्रकार?

या संपूर्ण प्रकाराबद्दल अधिक माहिती अशी की, मस्सा (खं) येथील सिताबाई रामभाऊ राऊत यांना गेल्या २० वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन मिळते. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांना ही पगार मिळत नसल्याचं त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं. यामूळे त्यांचा मुलगा जनार्धन राऊत यांनी तहसील कार्यालयात जाऊन विचारणा केली. संजय गांधी विभागातील अधिकारी यांनी सदरील लाभधारक हे मयत आहेत. त्या मुळे त्यांची पेन्शन बंद केली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली.

नजरचुकीने नोंद झाल्याचं तलाठीकडून कबूल

संजय गांधी निराधार योजनेतील लोकांच्या माहितीबद्दल काही कालावधीने संबंधित विभागात अहवाल देण्याचं काम हे त्या गावच्या तलाठ्यांचं असतं. त्याप्रमाणे तलाठी वाघ यांनी मस्सा गावातील लाभार्त्यांचं सूक्ष्म तपासणी अहवाल संबंधित विभागाला दिला. त्यात नजरचुकीने आपल्याकडून सीताबाई राऊत यांची मयत अशी नोंद झाली. याबाबत आपण तात्काळ वरिष्ठांना लेखी कळवलं, असं तलाठी महादेव वाघ यांनी सांगितलं.

हा योजनेचा गैरफायदा आहे का?

संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी होणेसाठी खालील निकष आहेत. ज्यात ती व्यक्ती असहाय्य, भूमिहीन, दारिद्र्य रेषेखालील तसेच ६५ वर्ष वयावरील असावी. तिला, किंवा तिच्या कुटुंबात कोणी कमावता व्यक्ती नसावा. तसेच तिचे मुलं 18 वर्षावरील झाल्यास म्हणजे सज्ञान झाल्यास ही योजना बंद होते. मात्र या प्रकरणात निराधार पगार चुकीच्या रिपोर्टमुळे थांबली, अशी तक्रार सज्ञान मुलांने दिली. मग ती वयोवृद्धा सज्ञान मुलगा असताना निराधार कशी?असा प्रश्न उपस्थित होतोय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in