मुंबईत गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

मुंबई तक

राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1544 बाधित रूग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात 2438 कोरोनाबाधित रूग्ण बरे देखील झाले आहेत. यामुळे एकूणच मुंबईची कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसतेय. बाधित रूग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रूग्णांची संख्या गेल्या 24 तासांमध्ये अधिक आहे. तर 60 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. मुंबई […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1544 बाधित रूग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात 2438 कोरोनाबाधित रूग्ण बरे देखील झाले आहेत. यामुळे एकूणच मुंबईची कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसतेय. बाधित रूग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रूग्णांची संख्या गेल्या 24 तासांमध्ये अधिक आहे. तर 60 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

मुंबई महापालिकेने कोरोना तपासणीसंदर्भात लागू केले ‘हे’ नियम

मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांच 2438 रूग्ण बरे झाले तर आतापर्यंत एकूण 636753 इतके कोरोनाचे रूग्ण बरे झाल्याची माहिती आहे. सध्याच्या घडीला बरं झालेल्या रूग्णांचा दर हा 92 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. याशिवाय 35702 सक्रिय रूग्ण आहेत. कोरोनाच्या दुप्पटीचा दर हा 231 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.

Tauktae Cyclone Alert : मुंबईत सोमवारी लसीकरण बंद राहणार – महापालिकेची माहिती

दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईमध्येही लसीकरण सुरु आहे. तौकताई चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर मुंबई महापालिकेने सोमवारी शहरातलं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ते 20 मे या कालावधीत आता शहरात पुढचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp