डोंबिवली : मेडीकल दुकान फोडत चोरट्यांनी पळवले चॉकलेट आणि परफ्युम
डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात एस.के.मेडीकल दुकानात रात्री चोरट्यांनी टाळ कापून महागडे परफ्यूम, चॉकलेट, कॉस्मेटिकचं सामान आणि १५ हजाराची रोकड लंपास केली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत दुकान फोडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दुकानाचे मालक सतीश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सकाळी शेजारील दुकानदाराचा फोन आला. शटरचं टाळं फोडण्यात आल्याचं समजताच कदम तात्काळ दुकानात […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात एस.के.मेडीकल दुकानात रात्री चोरट्यांनी टाळ कापून महागडे परफ्यूम, चॉकलेट, कॉस्मेटिकचं सामान आणि १५ हजाराची रोकड लंपास केली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत दुकान फोडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
दुकानाचे मालक सतीश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सकाळी शेजारील दुकानदाराचा फोन आला. शटरचं टाळं फोडण्यात आल्याचं समजताच कदम तात्काळ दुकानात पोहचले असता त्यांना दुकानातील सामान इथेतिथे फेकलेलं दिसलं. यानंतर दुकानातील रोख रकमेसह चॉकलेट आणि परफ्युम चोरीला गेल्याचं कदम यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गर्लफ्रेंडची माहिती न दिल्यामुळे मित्राची अपहरण करुन हत्या, दोन वर्षांनी झाला प्रकरणाचा उलगडा