Mumbra Fire: मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग, 4 रुग्णांचा मृत्यू
ठाणे: कोरोना संकटाच्या काळात हॉस्पिटलला आग लावून रुग्णांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. विरार आगीची घटना ताजी असतानाच आज (28 एप्रिल) पहाटे मुंब्र्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ज्यामध्ये आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात […]
ADVERTISEMENT

ठाणे: कोरोना संकटाच्या काळात हॉस्पिटलला आग लावून रुग्णांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. विरार आगीची घटना ताजी असतानाच आज (28 एप्रिल) पहाटे मुंब्र्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ज्यामध्ये आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुंब्र्याचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या आगीबाबत माहिती देताना ते असं म्हणाले की, या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2021
‘चार’ भयंकर दुर्घटना ज्याने अवघा महाराष्ट्र हादरला अन् हळहळलाही…
रुग्णालयाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवताना रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याचं कामही केलं. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले.
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातून आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ज्यापैकी 6 रुग्ण हे आयसीयूमध्ये होते तर 14 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते. तर आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या इतर रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
कधी आग तर कधी ऑक्सिजन गळती… सरकार करतंय तरी काय?
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर
या घटनेची माहिती देताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे देखील स्पष्ट केलं की, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5-5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याशिवाय जखमींना 1 लाखांची मदत करण्यात येणार आहे.
रुग्णालयांमध्ये सातत्याने होत आहेत दुर्घटना:
1. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीत 14 रुग्णांचा झाला होता मृत्यू
याआधी 23 एप्रिलला मुंबईच्या नजीक असणाऱ्या विरारमधील विजय वल्लभ या रुग्णालयाला देखील पहाटे लागलेल्या आगीत तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी या रुग्णालयाला आग लागली तेव्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. ज्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला होता.
2. नाशिकमध्ये ऑक्सिनजच्या गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू
तर विरारच्या आगीच्या घटनेआधी दोनच दिवसआधी म्हणजे 21 एप्रिलला नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना काही काळ ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नव्हता आणि त्यामुळे तब्बल 24 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यापैकी अनेक जण हे व्हेंटिलेटरवर होते.
3. भांडूपच्या सनराईज रुग्णालयात देखील आगीमुळे झाला होता 10 रुग्णांचा मृत्यू
साधारण महिन्याभरापूर्वी म्हणजे 25 मार्चला भांडूपमधील ड्रिम मॉलला लागलेल्या आगीत देखील कोरोनाच्या 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज नावाचं एक हॉस्पिटल सुरु करण्यात आलं होतं. जिथे 70 हून अधिक रुग्ण दाखल होते. यामधील सर्वाधिक रुग्ण हे कोरोना व्हायरसवर उपचार घेणारे होते. त्यावेळी लागलेल्या आगीत तब्बल 10 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते.
4. भंडाऱ्यात (Bhandara) रुग्णालयातील आगीमुळे 10 बालकांनी गमावला होता जीव
9 जानेवारी 2021 रोजी भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागात (SNCU)9 जानेवारीला पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. ज्यावेळी आग लागली तेव्हा या दोन्ही युनिटमध्ये मिळून तब्बल 17 बालकं होती. यावेळी एका युनिटमधील 7 बालकांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं. पण त्याचवेळी 10 चिमुकल्यांना आपला हकनाक जीव गमावावा लागला होताच.