भगतसिंह कोश्यारींविरुद्ध उदयनराजेंचा 'आक्रोश' : पदावरुन हटवण्यासाठीची भूमिका जाहीर - Mumbai Tak - udayanraje bhosale 3 december will express outrage at raigad - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

भगतसिंह कोश्यारींविरुद्ध उदयनराजेंचा ‘आक्रोश’ : पदावरुन हटवण्यासाठीची भूमिका जाहीर

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं. शिवाय, […]

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

शिवाय, आपण या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचही उदयनराजे यांनी जाहीर केलं. तसंच राज्यपाल कोश्यारींवर कारवाई झाली नाही तर कमीत कमी शिवाजी महाराजांच तरी नावंही घेऊ नये असाही, आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही त्यांनी आज पुन्हा एकदा आगपाखड केली.

उदयनराजे काय म्हणाले?

उदयनराजे भोसले म्हणाले, “आज स्वार्थापोटी सर्व पक्ष, मग प्रादेशिक असो की राष्ट्रीय… सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा वा मूर्ती असते. त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करतो, असंच सर्वजण म्हणतात. मग अशा पार्श्वभूमीवर विकृत विधान, चित्रीकरण यातून महाराजांची अवहेलना केली जाते. त्यांच्याबद्दल गलिच्छ चित्र निर्माण केलं जातं, त्यावेळी राग कसा येत नाही. त्यांचं नाव घेता मग राग का येत नाही?”

‘तुमचे पक्ष वेगवेगळे असतील, तुमचे अजेंडे वेगवेगळे असतील, पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता. मग हे विकृतीकरण थांबवत नसाल, तर छत्रपतींचं नाव का घेता. लहान मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोडका तोडका इतिहास त्यांच्यापर्यंत गेला, तर त्यांना तेच खरं वाटेल. आपण कधी या सगळ्याची दखल घेणार?’ त्यांच्यासमोर आपण कोणता इतिहास मांडणार आहोत? असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला.

या लोकांना कधी कळणार आहे? पक्षाच्या प्रमुखांना. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवू नका. त्यांचं विमानतळाला कशाला द्यायचं? कशाला बेगडी प्रेम दाखवायचं. शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला साजरा करायचा. हे बोलताना सुद्धा वेदना होताहेत”, असं म्हणताना उदयनराजे भोसले यांचे डोळे भरून आले. दाटून आलेल्या कंठाने ते म्हणाले, ‘असे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो, तर परवडलं असतं. काय दिवस आले. हेच दिवस बघायचे होते. प्रत्येक ठिकाणी राजकारण करत राहिलो, तर भविष्य काय?”, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 9 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!