Shiv Sena UBT: "अमित शाहांची विधाने म्हणजे सरकारचा केमिकल लोचा झाल्याचा पुरावा" - Mumbai Tak - uddhav thackeray attacks on amit shah and kiren rijiju in saamana editorial - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Shiv Sena UBT: “अमित शाहांची विधाने म्हणजे सरकारचा केमिकल लोचा झाल्याचा पुरावा”

Saamana Editorial: देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे, असं म्हणत सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना लक्ष्य केलं आहे. अमित शाह यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारचा केमिकल लोचा झाला असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय केली टीका? “देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा […]

Saamana Editorial: देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे, असं म्हणत सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना लक्ष्य केलं आहे. अमित शाह यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारचा केमिकल लोचा झाला असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय केली टीका?

“देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींवर अखेर तोंड उघडले आहे. अदानी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली. शहा यांनी आणखी एक मजेशीर विधान केले. त्यांनी असा विनोद केला की, सर्व कॉमेडी शो त्यापुढे फिके पडावेत. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे काम अत्यंत निष्पक्ष पद्धतीने सुरू आहे असे ते म्हणाले. शहा यांची ही विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे.”

“अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शहा सांगतात. मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याच वेळी कायदामंत्र्यांनी, रिजिजू यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत. ‘काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी टोळीत आहेत व त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरुद्ध उभे करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ अशी धमकीची भाषा न्यायमूर्तींच्या बाबतीत देशाच्या कायदामंत्र्यांनी करावी हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणायला हवे.”

पवारांनी तुमच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचा बल्ब पेटवला अन् सगळंच…: CM शिंदे

ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक; शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीका

“मुळात देशविरोधी टोळी म्हणजे काय व त्यात कोण सामील झाले? सरकारी निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करणे हे ज्यांना देशद्रोही कृत्य वाटू लागते ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक आहेत. त्यामुळे देशाचे गृहमंत्री व कायदामंत्री ‘लोकशाही’, ‘स्वातंत्र्य’, ‘तटस्थता’ वगैरे शब्दांचा वापर करून जो गोंधळ घालीत आहेत तो पटणारा नाही. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही कायदामंत्री रिजिजू यांनी विरोध दर्शविला. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही.”

“निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे. जगातील सर्व देशांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान बंद केले. कारण त्यात घोटाळे होत आहेत, पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्ष फोडले गेले. सरकारे पाडून त्यांना हवी तशी सरकारे बनवून देणारा कंत्राटदार म्हणून निवडणूक आयोग सध्या भाजपच्या मांडलिकाची भूमिका बजावत आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने हातोडा मारल्याने कायदामंत्र्यांनी निषेध व्यक्त केला.”

‘चुंबन, भीती आणि ‘नाटू-नाटू’, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका, कोणावर निशाणा?

“निवडणूक आयोग स्वतंत्र व निष्पक्ष नसेल तर देशातील निवडणूक व त्यातून निर्माण होणारी सरकारेसुद्धा निष्पक्ष राहू शकत नाहीत व गेल्या सात वर्षांत देशातील सर्व यंत्रणा, संस्था एकतर भ्रष्ट केल्या गेल्या किंवा आपल्या खिशात ठेवण्याचे काम झाले. गौतम अदानींचे सध्याचे प्रकरण त्यादृष्टीने विचार करायला लावणारे आहे.”

“अमित शहा विरोधकांकडे पुरावे मागत आहेत”

“गृहमंत्री म्हणतात, पुरावे असतील तर कोर्टात जा. मग राजकीय विरोधकांच्या बाबतीत ‘ईडी’, ‘सीबीआय’ने आधी अटका केल्या व मग कोर्टबाजी केली. अटक करण्यासाठी खोटे पुरावे उभे केले. पाच-पन्नास लाखांच्या व्यवहारासाठी विरोधकांना अटक केली तेव्हा अमित शहा यांनी ‘‘आधी कोर्टात जा’’ हा सल्ला दिला नाही, पण गौतम अदानी यांच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधकांकडे पुरावे मागत आहेत.”

“अदानी यांच्या विरोधात पुरावे असतील तर विरोधकांनी न्यायालयात जावे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगायचे व त्याआधी कायदामंत्र्यांनी न्यायालयांना धमकी देऊन मोकळे व्हायचे. म्हणजे उद्या कोणी उद्योगपती अदानी यांच्या विरोधात कोर्टात गेले, त्या प्रकरणात न्यायाधीशांनी काही भूमिका घेतली आणि ती सत्ताधाऱ्यांना पटणारी नसेल तर कायदामंत्री रिजिजू सांगतात त्याप्रमाणे त्या न्यायाधीशांना देशविरोधी टोळीतील सदस्य ठरवून बदनाम केले जाईल.”

‘एकनाथ शिंदे मेहनती…’ : बाळासाहेब थोरातांनी केलं मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक

“देशात लोकशाहीच्या नावाने धमकी राज”

“देशाच्या लोकशाहीची ही सध्याची अवस्था आहे. हिंदुस्थानात लोकशाही मारली जात आहे असे राहुल गांधी परदेशात बोलून गेले. आता त्यांनाही देशविरोधी ठरवून किंमत मोजावी लागेल. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. हे कसले लक्षण मानायचे? देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे. वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे.”

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…