‘अधिकाऱ्याला म्हणालो, मंत्रीपद गेलं तरी मला फरक पडत नाही’; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्तेपणामुळे आणि भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नितीन गडकरीच्या अशाच एका भाषणाची सध्या चर्चा होतेय. महात्मा गांधी यांच्या एका विधानांचा संदर्भ देत नितीन गडकरींनी मेळघाटातील जुना किस्सा उपस्थितांना ऐकवला. ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘नोकरशाही के रंग’ पुस्तक प्रकाशन समारंभात गडकरींनी मेळघाटातील पायाभूत सुविधा विकसित करताना आलेल्या अडथळ्यांचा अनुभव […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्तेपणामुळे आणि भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नितीन गडकरीच्या अशाच एका भाषणाची सध्या चर्चा होतेय. महात्मा गांधी यांच्या एका विधानांचा संदर्भ देत नितीन गडकरींनी मेळघाटातील जुना किस्सा उपस्थितांना ऐकवला. ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘नोकरशाही के रंग’ पुस्तक प्रकाशन समारंभात गडकरींनी मेळघाटातील पायाभूत सुविधा विकसित करताना आलेल्या अडथळ्यांचा अनुभव सांगितला.
नितीन गडकरींनी सांगितला महात्मा गांधींचा विचार
नितीन गडकरी म्हणाले, “महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे की, गरीब, शोषितांना न्याय मिळत असेल आणि त्यासाठी तुम्हाला कायदा मोडावा लागत असेल, तर जरूर कायदा तोडा कारण त्यात सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीचं हित आहे. पण स्वार्थासाठी आणि चुकीच्या उद्दिष्टांसाठी कायदा तोडत असाल, तर ते चुकीचं आहे.”
‘नितीन गडकरींचे बरोबर पाय कापले’; आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेनेचे अरविंद सावंत काय बोलले?
नितीन गडकरींनी सांगितला मेळघाटातील प्रसंग
“महाराष्ट्रात मंत्री असताना मला एक चांगला अनुभव आला होता. अमरावती जिल्ह्यात मेळघाट तालुका आहे. तिथे अडीच हजार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक स्तरावर त्याची चर्चा सुरू झाली. ही १९९६-९७ मधील घटना आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मला म्हणाले की, ही काय परिस्थिती आहे. मेळघाटात ४५० गाव आहेत आणि एकाही गावात जायला रस्ता नाही. ये लोकांचं कसं होईल? मी त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो आणि सातत्यानं बैठकी घेत होतो.”