केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

नितीन गडकरी कोरोना झाल्याने होम क्वारंटाईन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोना झाला आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे. सौम्य लक्षणांसह माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सगळ्या आवश्यक प्रोटोकॉल्सचं पालन करून मी स्वतःला विलीगीकरणात ठेवलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईन असून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःला विलग करावं आणि कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती नितीन गडकरी यांनी केली आहे.

सोमवारीच राजनाथ सिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापाठोपाठ आता नितीन गडकरी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आजच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधले सर्वात कार्यक्षम आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले मंत्री मानले जातात. त्याचनिमित्ताने त्यांचा जनतेशी संपर्कही अनेकदा येतो. आता त्यांना कोरोना झाल्याने ते होम क्वारंटाईन झाले आहेत. कोरोनाची त्यांना सौम्य लक्षणं दिसत आहेत. तरीही संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती
कोरोना डेंग्यू, मलेरियासारखा होणार म्हणजे काय Dr. Shashank Joshi काय म्हणतात?

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटने महाराष्ट्राचं आणि देशाचं टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रात 34 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आज आढळले आहेत. या रूग्णांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे रूग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत कारण डेल्टाप्रमाणेच हा व्हेरिएंटही संसर्गजन्य आहे. महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीचे निर्बंधही लादण्यात आले आहेत. तसंच जिम, ब्युटी पार्लर्स, थिएटर्स या सगळ्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी 50 टक्के उपस्थिती असावी असं म्हटलं आहे. त्याचसोबत कोरोनाचे प्रतिबंध पाळले जावेत असंही आवाहन वारंवार प्रशासनाकडून आणि सरकारकडून केलं जातं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी
महाराष्ट्रातील कोरोना चाचणी (फोटो सौजन्य - India Today)

सध्याच्या कोरोना व्हेरिएंटमुळे रूग्णसंख्येत वाढ होत असली आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढत असला तरीही डेल्टाच्या तुलनेत आता रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण हे बरंच कमी आहे. मात्र त्यामुळे राज्यात आणि देशात होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in