'संजय आठवतोय का?', उर्फी जावेदनं ठेवलं चित्रा वाघ यांच्या वर्मावर बोट

urfi javed vs chitra wagh controversy : चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात रंगल शाब्दिक युद्ध
Urfi Javed attacks on chitra wagh over sanjay rathod
Urfi Javed attacks on chitra wagh over sanjay rathod

Urfi Javed News : वेशभूषेमुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघांनी केल्यानंतर उर्फीही भडकलीये. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघांचा पिच्छा सोडत नसलेल्या मुद्द्यावरच उर्फीने बोट ठेवलंय. (Urfi Javed criticized chitra wagh over sanjay rathod)

बोल्ड फॅशनमुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. कपड्यांवरून तिला अनेकदा ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो. मात्र, आता तिच्याविरुद्ध भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतलीये.

चित्रा वाघांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. चित्रा वाघ यांनी तशी तक्रारही आयुक्तांना दिली. चित्रा वाघांनी तक्रार दिल्यानंतर उर्फी जावेदकडूनही टीका झालीये.

Urfi Javed attacks on chitra wagh over sanjay rathod
'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...', अंधारेंकडून कंगना, अमृता फडणवीसांचे फोटो शेअर

संजय राठोडांच्या मुद्द्यावरून उर्फीने चित्रा वाघांना डिवचलं

उर्फी जावेदनं आता संजय राठोडांच्या मुद्द्यावरून चित्रा वाघांना सवाल करत वर्मावर बोट ठेवलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ या संजय राठोडांविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या काळात संजय राठोडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.

मात्र, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती झाल्यानंतर संजय राठोड पुन्हा मंत्री झाले आणि याच मुद्द्यावरून चित्रा वाघ यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असताना उर्फी जावेदनंही त्यावरच बोट ठेवलं आहे.

उर्फी जावेदनं ट्विट केलं आहे. ती म्हणते, "भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी वाट बघू शकत नाही. चित्रा जी , तुम्हाला संजय आठवतो का? तुम्ही भाजपत प्रवेश केल्यानंतर तुमची मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरून गेल्या. ज्यावरून तुम्ही राष्ट्रवादीत असताना हल्लाबोल केला होता."

Urfi Javed attacks on chitra wagh over sanjay rathod
'जेलमध्ये जाण्यास तयार, आधी...', उर्फी जावेदचं चित्रा वाघांना आव्हान

उर्फी जावेदनं आणखी एक ट्विट केलं आहे, ज्यात ती म्हणते की, "चित्रा जी, आपण लवकरच मैत्रिणी होणार आहोत."

चित्रा वाघांनी उर्फीला दिला होता थोबडावण्याचा इशारा

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला धडा शिकवण्याचाही इशारा दिलाय. माझ्यासमोर आली, तर आधी थोबडावेन आणि नंतर सगळ्यांना सांगेन, असं चित्रा वाघ म्हणालेल्या आहेत. चित्रा वाघ यांच्या या इशाऱ्यानंतर उर्फी जावेद सातत्यानं टीका करताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in