ठाकरेंच्या दौऱ्याचा अब्दुल सत्तारांनी घेतला धसका? मध्यरात्री घेतली ‘त्या’ कुटुंबाची भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर ठाकरे मुंबई बाहेरच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या एका घटनेची सध्या चर्चा होतेय, ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतलेली शेतकरी कुटुंबाची भेट. आता या भेटीचा संबंध थेट उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी लावला जातोय. उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या […]

social share
google news

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर ठाकरे मुंबई बाहेरच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या एका घटनेची सध्या चर्चा होतेय, ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतलेली शेतकरी कुटुंबाची भेट. आता या भेटीचा संबंध थेट उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी लावला जातोय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या ऋषिकेश ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरी जाणार असं समजते.

ही माहिती समोर आल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी रात्री १२ वाजता गंगापूर तालुक्यातल्या बुट्टेवडगाव आणि सिद्धनाथ वाडगाव येथे भेट दिली. तसेच ऋषिकेशच्या घरी पोहोचले. ऋषिकेशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात तो म्हणतो, पैसे नसल्यानं दिवाळीला कपडे घेतले नाही. अब्दुल सत्तार ऋषिकेशच्या घरी गेले. त्यांनी फटाके, कपडे, मिठाई आणि रोख ५० हजार रुपये अशी मदतही दिली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यात पीक पाहणी करून पत्रकार परिषदही घेणार आहेत. ऋषिकेशची भेट घेण्याचीही शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करू शकतात आणि त्यामुळेच अब्दुल सत्तारांनी आधीच भेट घेऊन ठाकरेंची संधी हिरावून घेतल्याची, तर दुसरीकडे सत्तारांनी ठाकरेंच्या दौऱ्याचा धसका घेत ही भेट घेतल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जातं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT