विलास लांडे शरद पवारांच्या गटात परतणार?
विलास लांडे शरद पवारांच्या गटात परतणार असल्याची घोषणा त्यांच्या पुत्राने केली आहे.

ADVERTISEMENT
अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या गटात परतण्याचे ठरल्याचे त्यांच्या पुत्राने जाहीर केले आहे. विक्रांत लांडेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर ही घोषणा केली. शरद पवारांनी तारीख दिली की विलास लांडे त्यांच्या गटात परततील असे विक्रांत लांडे सांगत आहेत. यापूर्वीही विलास लांडेंनी शरद पवारांच्या अनेक भेटी घेतल्या आहेत, परंतु त्यांनी स्पष्टपणे कधीच त्यांच्या पुनःप्रवेशाबद्दल बोलले नव्हते. त्यामुळे, शहरात ही चर्चा रंगत आहे की विलास लांडे निश्चित कधी परतणार?