दुष्कर्म ते एन्काऊंटर! अक्षय शिंदेची A to Z स्टोरी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. इतर आरोपी फरार आहेत.

ADVERTISEMENT
गेल्या महिन्याभरापासून ज्या बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वातावरण तापलेलं होतं. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर करण्यात आला. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. एकीकडे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा भाजप आणि संघाशी संबंध असल्याचा आरोप होत होता. तर, दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या बायकोने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करत अक्षय शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला होता. बलात्कार ते एन्काऊंटरपर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. नेमकं कधी काय घडलं? या प्रकरणी आतापर्यंत किती लोकांना निलंबीत करण्यात आलंये? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधी पक्षाकडून काय आरोप केले जाताहेत? जाणून घेऊयात बदलापूर प्रकरणातील अत्याचार ते एन्काऊंटर अशी संपूर्ण A to Z स्टोरी.