AJIT Pawar : पवारांचा खासदार अजितदादांच्या बॅनरवर, नेमकं चाललंय काय?

मुंबई तक

खेड तालुक्यातील अजित पवारांच्या बॅनरवर अमोल कोल्हे यांचा फोटो लावल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Ajit Pawar News : जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभर प्रवास करत आहेत. लाडकी बहीण योजनेचा प्रसार करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीचीही तयारी करण्यात येत आहे. परंतु आता पुण्यातील खेड तालुक्यात अजित पवारांनी घेतलेल्या कार्यक्रमातील बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो लावण्यात आला आहे. पहिल्याच क्रमांकावर अमोल कोल्हे आणि त्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो लावण्यात आल्याने यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

    follow whatsapp