आर्यन मिश्रावर गोळीबार आणि साबिर मलिकचं मॉब लिंचिंग: तीन दिवसात दोन हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

गोरक्षणाच्या नावाखाली हरयाणामध्ये 3 दिवसांत 2 हत्यांनी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

social share
google news

Sabir Malik Latest Update :  गोरक्षणाचा मुद्दा भारतात पुन्हा डोकं वर काढतोय की हरयाणामध्ये निवडणुकीचा मुद्दा बनतोय? अशी चर्चा सध्या सुरू आहे. १९ वर्षांच्या आर्यन मिश्राची गोळी घालून हत्या आणि त्यानंतर साबिर मलिक नावाच्या तरुण मजुराला गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरुन मारहाण झाली. ज्यात साबिरचा मृत्यू झाला. अवघ्या 3 दिवसांच्या अंतराने हरयाणामध्ये गरक्षणासाठी दोन हत्या झाल्याने लोकांमध्ये भीती आहे. या घटनांनी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोरक्षण आणि त्याच्या नावाखाली होणारी हिंसा या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आर्यन मिश्राच्या हत्येनंतर गावकऱ्यांमध्ये संताप आहे आणि ते न्या याची मागणी करत आहेत. साबिर मलिकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये शोकाकुल वातावरण आहे. या दोन्ही घटनांनी गोरक्षणाच्या विषयावर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया अधिक तीव्र केल्या आहेत. ह्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि वेगवेगळी संघटना ह्याचं विरोध करत आहेत. हरयाणामध्ये निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनांनी वातावरण तापलं आहे. यातून गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांवर नवा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT