Video : खासदार आमदाराच्या चालकांमध्ये जोरदार हाणामारी, बेल्टने एकमेंकांना...

मुंबई तक

इचलकरंजी येथे धैर्यशील माने आणि प्रकाश आवाडे यांचे वाहन चालकांमध्ये वाद व हाणामारी.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Kolhapur News : पालकमंत्री हसन मुश्रीफ इचलकरंजी येथे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आलेले असतानाच हाणामारी झाली. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये शिवीगाळ तसेच हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाला.

स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. या प्रकरणाबाबत अधिक तपास करण्यात येत आहे, आणि दोन्ही पक्षांनी परस्परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. स्थानिक राजकीय वर्तुळात या घटनेबद्दल चर्चा रंगली आहे.

    follow whatsapp